Header Ads Widget

लोहा पोलिसांचे दोन ठिकाणी दारूवर छापे ३ लाख ५३ हजार ८०० रुपयाचा मुद्देमाल जप्त पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांची कारवाई

         माधव पवार
नांदेड जिल्हाचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशानुसार लोहा पोलीस ठाण्याचे दबंग पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्या टीमने लोहा शहरां मध्ये दोन ठिकाणी अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनावर छापे मारी केली आहे

या सदरच्या छापे मारी मध्ये लोहा पोलिसांनी ३ लाख ५३ हजार ८०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदरच्या कारवाई मध्ये लोहा पोलीसच्या टीमने अवैध दारूसह देशी दारू वाहतूक करणारी दोन वाहने ही केली जप्त केली अशी माहिती पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी दिली आहे 

लोहा पोलिसांनी तीन ठिकाणी अवैध दारू अड्यावर छापे मारून या पूर्वी हजारोचा मुद्देमाल जप्त केला होता 
तर दोन दिवसा पूर्वी अवैध जुगारावर छापे मारी करून हजारोचा मुद्देमाल जप्त केले गुन्हे दाखल केले होते

लोहा पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक चिंचोलकर हे रुजू झाल्यापासून हवेचे धंदे वाल्या वर कडक कारवाई सुरू असून अवैध धंदेवाल्याचे चांगलेच कंबरडे मोडले आहे.

अनेक धंदेवाल्यांनी आपले धंदे बंद करून गाशा गुंडाळला असून जनसामान्यातून लोहा पोलीस करत असलेल्या कारवाईचे मोठ्या प्रमाणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्या कडून स्वागत होत आहे

सदरची कारवाई पोनि चिंचोलीकर यांच्या आदेशाने पीएसआय नाईक, रवी मडके, दीपक गुट्टे,यांनी केली आहे 

Post a Comment

0 Comments