Header Ads Widget

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या सभे दरम्यान मराठी समाजाचा प्रचंड रोष - धर्माबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी परिस्थिती हाताळली -

         माधव पवार
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या धर्माबाद येथील सभेच्या दरम्यान मराठा समाजाच्या वतीने तीव्र रोष व्यक्त करण्यात आला आहे

नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक धरणे यांच्या सूचनेनुसार धर्माबाद पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या सभेदरम्यान निर्माण होत असलेली परिस्थिती योग्य रीतीने व थंड दिमाखाने हाताळली आहे 
राज्यात एकीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरातली सराटी येथे उपोषण करते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणास बसल्यामुळे त्यांना पाठिंबा देण्यासाठी नायगाव तहसील कार्यालया समोर तर वजीरगाव येथे अमरण उपोषण करण्यात येत असून त्याच बरोबर धर्माबाद येथे साखळी उपोषण करण्यात येत आहेराज्यात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आमरण उपोषण केले जाते तर साहेब धर्माबाद येथे सभा तुम्ही
घेण्याची काही आवश्यकता नव्हती अशा पद्धतीचा रोष मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला असून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या समोर शेकडो मराठा समाजाच्या कार्यकर्त्यानी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात मुद्दा उपस्थित केला आहे

नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या समक्ष होत असलेला तीव्र रोषाची परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली आहे

बिलोली उमरी लोहा मुखेड कुंडलवाडी सध्याच्या परिस्थिती मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका असल्याने राजकीय नेते सभा घेण्याच्या तयारीला लागले तर दुसऱ्या बाजूने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात आमरण उपोषण करीत आहेत 
 




Post a Comment

0 Comments