विशेष प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे :-
श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्रिंबकेश्वर नाशिक यांच्या वतीने विवाह संस्कार विभाग आयोजित भव्य सर्व जाती धर्मीय वधू वर परिचय मेळावा दिनांक १०सप्टेंबर रोजी रविवारी आठ ते पाच या वेळात श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व्यंकटेश नगर नायगाव येथे आयोजित केला आहे
कार्यक्रमा निमित्त आयोजित केलेल्या मेळाव्यास प्रमुख उपस्थिती गुरुपुत्र आदरणीय आबासाहेब मोरे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे
श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित यांचे विवाह संस्कार विभाग अंतर्गत परमपूज्य गुरुमाऊलीचे आशीर्वचन व आदरणीय आबासाहेब यांच्या मार्गदर्शनाने नांदेड जिल्ह्यात सर्व धर्मीय सर्व जातीय वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शेतकरी भाविक सेवेकरी तसेच समाजातील सर्व स्तरातील कुटुंबातील विवाह इच्छुक मुला मुलांनी विवाह नोंदणी करावी असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

0 Comments