Header Ads Widget

कुंटूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अज्ञात चोरट्याने तीन घरे फोडून १ लाख ३ हजार ७०० रुपयाचा आय ऐवज केला लंपास श्वान पथकाला पाचारण -

        माधव पवार
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या म्हणजे प्रॉपर कुंटूर येथे दिनांक १८ सप्टेंबर २०२३ रोजीच्या मध्यरात्री आज्ञात चोरट्याने धुमाकूळ घालीत तीन घरे फोडून एकंदरीत अंदाजे एक लाख तीन हजार ७०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली असल्यामुळे सदरील प्रकरणाचा तपास लागावा म्हणून श्वान पाथकाला पाचारण करण्यात आले आहे

तालुक्यातील कुंटूर येथे अज्ञात चोरट्या कडून तीन घरे फोडण्याची माहिती असून नायगाव ते कुंटूर इकळीमाळ रस्त्याच्या मुख्य ठिकाणी असलेल्या बस स्टँड जवळ एका प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागे असलेल्या गल्लीतील जामा मशिदी जवळ रस्त्याच्या विद्युत खांबांचे पथदिवे बंद असल्याने त्या अंधाराचा फायदा घेऊन  अज्ञात चोरट्याने आपला हात साफ केला आहे

 प्रॉपर कुंटूर येथे अज्ञात चोरट्यांनी रऊफ अल्लाबकस यांच्या घराचे दार काढून घरात प्रवेश केला या ठिकाणी २  तोळे सोने ४ तोळे चांदीचे दागिने व रोख ९ हजार तर मतीन नबीसाब गुजीवाले यांच्या घरातील १ तोळा सोने ३० तोळे चांदी तर बालाजी मामीडवार यांच्या दुकानात  चोरट्यांनी आपला मोर्चा वळवित दुकानातील काही साहीत्य बाहेर फेकले तर अन्य दोन घरे ही चोरट्यांनी फोडले असल्याचे कळते आहे

कुंटूर गावात अज्ञात चोरट्याने धुमाकूळ माजवीत एका व्यक्तीचे म्हणजे मन्नान गुजीवाले यांच्या अंगणात बांधून असलेल्या बोकडाला चोरट्यांनी जीवे मारून टाकले असून या घटनेत चोरट्यांनी त्यांच्या कडे असलेला एक ऊस तोडण्याचा लोखंडी कत्ता सोडून पळ काढला असल्याचे सांगण्यात येत आहे

ठाण्याचे सपोनि विशाल बहात्तरे यांच्या मार्गदर्शनाखाली
फौजदार कुसमे सदरील घटनेची पाहणी करून तात्काळ श्वान पथकासह फिंगरप्रिंट कर्मचाऱ्यांना पाचरण करण्यात आले असून सदरील प्रकरणात अज्ञात आरोपीच्या  विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आहे



Post a Comment

0 Comments