लोह पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या गावासह शहरात शांतता आबादीत राहण्यासाठी पोलीस स्टेशन प्रयत्न करीत असून कोणी शांततेचा भंग करून कायदा हातात घेत असेल त्याची मुळीच गैय केली जाणार नाही असे लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे
पोलीस ठाण्याच्या अंतर्गत अवैध देशी दारू मटका जुगार तिर्रट अंधर बाहर त्याच बरोबर क्रिकेटचा सामन्यावर सट्टा बट्टा लावण्याचा प्रयत्न कुणी करत असेल तर त्यांच्याकडे लोहा पोलिसांची करडी नजर असल्याचे दबंग पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी ठणकावून सांगितले आहे
लोहा पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारण्याचा नंतर पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी शहरातील वाहतूक सुरळीत करण्या बरोबर रस्त्यावर आलेले व्यापाराचे अतिक्रमण गाडे मोटर सायकलवर दादा काका मामा असे लिहून सर्रास शहरा मध्ये वावरणाऱ्या वाहनावर त्याच बरोबर पोलीस ठाण्यात कपड्यांच्या गुंड्या काढून मोकाट पणे फिरणाऱ्या ३ ते ३ लोकांवर कारवाई करण्यात आल्या आहेत

0 Comments