Header Ads Widget

नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागात स्मशान भूमीचा प्रश्न गंभीरच - दुर्दैवी घटना घडल्यावरच येते गावकऱ्याना जाग ?

              माधव पवार
नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागात स्मशान भूमीचा प्रश्न गंभीरच असल्यामुळे या बाबीकडे लोक प्रतिनिधीसह जिल्हा प्रशासन लक्ष देत नसल्याने ऐनवेळी गावांत काही अनुचित प्रकार व दुर्दैवी घटना घडल्या वरच य गावकऱ्यासह सरपंच व उपसरपंच ग्रामसेवक तसेच प्रशासन यांना जाग ? येत आहे
अशा बाबीकडे कोणी हीं गांभीर्याने लक्ष देत नसल्याने स्मशान भूमीचा प्रश्न वरचे वर गंभीर बनत असून या लोकप्रतिनिधीने लक्ष नेत नसल्यामुळे स्मशान भूमीचे कामे लागावेत अशी अपेक्षा जनतेनी केली आहे 

तालुक्यातील रुई बु सह अन्य गावात स्मशान भूमीच्या दुरुस्तीसाठी व कामकाज करण्यासाठी शासन जरी निधी देत असले तरी त्या स्मशान भूमीचा प्रश्न आज गंभीर असल्यामुळे शासनाने व लोकप्रतिनिधीसह गावकऱ्यानी तसेच सरपंच व उपसरपंच यांनी लक्ष देण्याची गरज आहे

अनेक स्मशान भूमिला जाण्यासाठी व येण्यासाठी रस्ते नसल्यामुळे चिखलाच्या रस्त्यातुन अंत्ययात्रा काढव्या लागत असले अनेक उदाहरणं पाहवयास मिळाले आहे 


Post a Comment

0 Comments