मागील तीस वर्षा पासून प्रलंबित असणारा मराठा आरक्षणाचा प्रश्न कुठल्या ही सरकारने आज पर्यंत निकाली काढले नाही म्हणून मराठा समाजाने अनेक वेळा लोकशाही मार्गाने आंदोलने केली आणि सरकारने वेळोवेळी समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहेराज्यातले सरकार घातक गुन्हे दाखल केले आमच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी नायगाव तहसील कार्यालया समोर सतीश पाटील कदम व गजानन पाटील कदम व वजीरगाव येथे हणमंत पाटील ढगे अमरण उपोषण करीत आहेत
या देशातील लोकशाही जिवंत आहे का ? असा संतप्त सवाल मराठा समाज या निवेदनाच्या माध्यमातून सरकारला विचारत असल्यामुळे येत्या दिनांक ११ सप्टेंबर २०२३ रोजी नायागांव तालुका बंद राहील व रास्ता रोको साठी सकल मराठा बांधवानी सज्ज राहावे असे आवाहन करण्यात आले आहे प्रा रवींद्र पाटील चव्हाण भास्करराव भिलंवडे माणिकराव चव्हाण सोनालीताई हंबर्डे बाबासाहेब पाटील शिंदे रितेश पाटील कल्याण अजिंक्य पाटील कल्याण रावसाहेब पाटील शिंदे रणजित पाटील देशमुख चंद्रकांत पाटील पवार जगन पाटील जाधव साई पाटील मोरे साई पाटील मोकादरकर संदीप पाटील रातोळीकर ओंमकार पाटील घाटोळ आदी वेळी उपस्थित होते यावेळी बालाजी पाटील जाधव सुगावकर गणेश पाटील कदम मारोती पाटील भागानगरे प्रताप पाटील सोमठाणकर साईनाथ पाटील ढगे श्रीहरी पाटील कदम माणिक कदम हणमंत इंगळे रुई कर यादी मराठा बांधव यावेळी उपस्थित होते
नायगाव सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने राज्य कर्त्यांना नम्र विनंती करण्यात येते की मराठा समाजाच्या आरक्षणाचा महत्वाचा प्रश्न मार्गी लावूनच त्यानी राज्यभर दौरे करावेत अन्यथा त्यांना जागोजागी मराठा बांधवाच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा रोखठोक सवाल व इशारा नायगाव तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे
🚩 चक्का जाम नायगाव तालुका बंद 🚩
सकल मराठा समाजाच्या वतीने नायगाव तहसील येथे अमरण उपोषण सुरू असल्यामुळे उपोषणकर्ते गजानन कदम सतीश पाटील कदम यांच्या समर्थनात नायगाव तालुका बंद व चक्काजाम हाक देण्यात आली तरी सर्व समाज बांधवांनी ११ तारखेला आपले दुकाने बंद ठेवून समाजाला सहकार्य करावे ही नम्र विनंती आहे

0 Comments