जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतराली सराटी येथे आमरण उपोषण करते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी नायगाव तालुक्यातील हिप्परगा येथील सतीश रामचंद्र पाटील कदम त्याचबरोबर शिवाजी पाटील कदम यांच्यासह वजीरगाव येथे हनमंत बालाजीराव पाटील ढगे उपोषणाला बसले आहेनायगावच्या तहसील कार्यालया समोर नायगाव पोलीस ठाण्याच्या कर्तव्यदक्ष महिला पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी उपोषण स्थळी चांगलाच पोलीस बंदोबस्त ठेवला तर कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहातरे यांनी चोक पोलीस बंदोबस्त ठेवला आहेतालुक्यातील दोन्ही उपोषणाला विविध संघटनेच्या माध्यमातून पाठिंबा मिळत असल्यामुळे दिनांक५ सप्टेंबर २०२३ पासून वजीरगाव येथे हणमंत बालाजीराव पाटील ढगे यांचे मराठा समाजाला आरक्षण मिळावे अमरण उपोषणास बसले तर सतीश रामचंद्र पाटील कदम व गजानन पाटील कदम यांनी दिनांक ६ सप्टेंबर २०२३ पासून नायगावच्या तहसील कार्यालया समोर उपोषण करीत आहे
नायगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील तहसील कार्यालया समोरील व कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील होत असलेल्या अमरण उपोषणाकडे आरोग्य विभागाचे अधिकारी सज्ज असले तरी सदरच्या उपोषण कर्त्यांची हालत बिघडत चाली आहे

0 Comments