Header Ads Widget

सावधान : शहर वाहतूक शाखा वजीराबाद नांदेड यांच्या वतीने महत्वाचे आवाहन नियमाचे उलंघन केल्यास थेट कारवाई पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर -

         माधव पवार
नांदेड शहरामध्ये काही वेळा काही ठिकाणी ट्राफिक जाम होत असते रस्त्यामध्ये वाहन उभे केल्याने दुकानाचे सामान लावल्याने हात गाड्यामुळे किंवा इतर रस्त्यात लावलेल्या दुकानामुळे तसेच दुकानाच्या बोर्डामुळे मोकाट जनावरंमुळे रॉंग साईड गाडी टाकल्याने व इतर अशा कारणामुळे ट्राफिक जाम होते ट्राफिकचा चार्ज पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी स्वीकारल्यामुळे ते सुरळीत होत आहे 
शाळा कॉलेज क्लासेस परिसरा मध्ये रोड रोमिओ किंवा चिडीमारी करणारे सतत त्या परिसरामध्ये विनाकारण फिरणारे एखाद्या विशिष्ट पॉईंटवर थांबून छेड काढणारे या बाबत माहिती तसेच नांदेड शहरांमध्ये रेसिंग करणारे रेस लावणारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहने चालविणारे ज्या पालकांची मुले पालकांनी सांगुन ही ऐकत नाहीत व नंतर त्यातून एखादी मोठी दुर्घटना घडते अशा बाबीकडे ट्रॅफिकचे पोलीस अधिकारी चिंचोलकर यांनी लक्ष केंद्रित केले आहेशहरातील अश्या बाबी रोकणे साठी रोडवर अचानक धोकादायक रित्या गड्डा पडला असेल मोठ्या नालीला झाकण नसेल किंवा अश्या प्रकारच्या बाबीमुळे अपघात घडून येऊ शकतो अश्या बाबीमुळे वाहन धारकानी नजर समोर ठेवून वाहने चालविल्यास होणारे अपघात टळतात यासाठी वाहन धारकांना महत्वाची सूचना पोनि चिंचोलकर यांनी दिली आहे 

वरील अशा सर्व ट्रॅफिक समस्या बाबत सामान्य नागरिकाला अनेक समस्या भेडसावत असतात, पण या छोट्या समस्येसाठी नागरिक पोलीस स्टेशन किंवा ट्राफिक कार्यालयापर्यंत पोहोचणे सोयीचे नसते म्हणून नांदेड वजीराबाद ट्राफिक समस्यांसाठी व्हाट्सअप नंबर ९५५२५०९८२० यावर संपर्क करावा असे ही आवाहन पोलीस ओमाकांत चिंचोलकर यांनी केले आहे 
शहर वाहतूक शाखा वजीराबाद नांदेड यांनी मा. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशाने व अप्पर पोलीस अधीक्षक  व होम डिव्हायएसपी मॅडम यांचे मार्गदर्शनाप्रमाणे वन क्लिक वर ट्राफिक समस्या ट्राफिक ऑफिसला करता येईल अशी योजना सुरु केली आहेयासाठी  डिजिटलायझेशनचा वापर करून वरील समस्या संदर्भात नागरिकांनी त्या समश्येचा फोटो किंवा काय समस्या आहे ते ट्राफिक  व्हाट्सअप क्रमांकावर पाठवायची आहे.

सदरचे समस्या प्राप्त होतात ते कार्यालयातून लागलीच पेट्रोलिंग वर असलेले रायडर यांच्याकडे जाईल आणि रायडर त्या ठिकाणी तात्काळ पोहोचुन कारवाही करतील. ज्या समस्या मोठ्या आहेत किंवा इतर डिपार्टमेंटची संबंधित आहे त्याबाबत पत्रव्यवहार करून नियोजन करून दूर केल्या जातील.

रोजच्या दगदगीच्या जीवनामध्ये सामान्य माणूस घरून निघाल्यानंतर वेळेत आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचावा आणि संध्याकाळी लवकर आपल्या घरी कुटुंबात पोहचावा व इतर समस्या दूर करता याव्या यासाठी नांदेड ट्राफिक पोलिसांनी सदरची मोहीम हाती घेतली आहे.

 


 

Post a Comment

0 Comments