मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आमरण उपोषणाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते धरणीला पडले " अन नायगावच्या आमदाराचे मात्र बॅनर झळकू लागले असून राज्यात एकीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जालना जिल्ह्यातील अंतराली सराटी येथील उपोषण करते मनोज जरांगे यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे
त्यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील हिप्परगा (जाने ) येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश रामचंद्र पाटील कदम व गजानन पाटील कदम यांनी नायगावच्या तहसील कार्याला समोर उपोषणास बसले आहे
तालुक्यातील वजीरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व उपोषणकर्ते हनमंत बालाजीराव पाटील कदम यांनी उपोषणा दरम्यान धरणीला पडले असताना सुद्धा नेते भेटी देण्यासाठी तयार नाहीत हे दुर्दैवी बाब आहे नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमदार यांनी एका मंत्र्याच्या दौऱ्या दरम्यान नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या नायगाव येथील डॉ हेडगेवर चौक येथे बॅनर बाजीवर झळकत असताना दिसून येत आहेतराज्यातील व जिल्ह्यातील राजकीय पुढार्यांना बॅनर बाजी करून एकीकडे झळकायचे पडले तर दुसरीकडे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अमरण उपोषणाच्या माध्यमातून उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली जात आहे
या जिल्ह्यातील कोणता ही राजकीय पुढाऱ्यांनी अद्याप तरी उपोषणकर्त्याची भेट घेतली नसल्याने अनेकातून संताप व्यक्त केला जात आहे
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कार्यकर्ते आमरण उपोषणाच्या माध्यमातून धरणीला पडले " अन " नायगावच्या आमदाराचे मात्र बॅनर झळकू लागले आहे

0 Comments