नांदेड जिल्ह्यचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशानुसार जिल्हाभर पोलीस विभागाच्या मार्फत स्पीड कंट्रोलची पोलीस जीप वाहनाच्या स्पीड वर लक्ष ठेवून असल्याने सावधान वाहन धारकांनो आपले वाहने कंट्रोल ठेवण्याची गरज आहे
नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर ९५ ची स्पीड असल्यामुळे वाहन धारकानी आपले वाहने त्यापेक्षा जास्त गतीने वाहने चालविल्यास ऑटोमॅटिक फाईन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे
जिल्हाभर स्पीड कंट्रोलची लाल दिव्याची पोलीस जीप फिरत असल्याने आपले वाहने ९५ च्या स्पीड पेक्षा जास्त गतीने पळविल्यास वाहने स्पीड कंट्रोलच्या नजर कैदेत असल्यामुळे सदरची फाईन लागू शकते त्यासाठी वाहन धारकांनी सदरच्या मार्गावर असलेल्या बस स्टॅन्ड जवळ वहानाची स्पीड ५० पेक्षा जास्त नसावी असावी असा नियम आहे
बस स्टँडच्या पुढे गेल्याच्या नंतर वाहनाची स्पीड ९५ पेक्षा जास्त नसावी असा सदरीलच्या कंट्रोल स्पीड पोलीस वाहनांचा नियम असल्याने आपले वाहने सावकाश ठेवून अपघात सुद्धा टाळण्याची गरज आहे
पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पीड कंट्रोलच्या पोलीस गाडीवर हेड कॉन्स्टेबल कवठेकर झुंबाडे चालक ढवळे सदरच्या स्पीड कंट्रोलच्या पथकात सदरची कामगिरी बजावत आहेत

0 Comments