Header Ads Widget

जिल्ह्यातील राजकीय पुढारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत झाले मग्न वजीरगाव येथील कार्यकर्त्यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष ? - तिसरा दिवस - ९ सप्टेंबर पासून पाणी सोडणार -

         माधव पवार 
नांदेड जिल्ह्यातील कोणत्या ही राजकीय पुढाऱ्यानी सध्याच्या परिस्थिती मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका लागल्यामुळे बिलोली उमरी मुखेड लोहा कुंडलवाडी इकडेच लक्ष केंद्रित जास्त प्रमाणात केले  परंतु मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात तात्काळ निर्णय घ्यावा म्हणून वजीरगाव येथील सामाजिक कार्यकर्ता हनमंत बालाजीराव पाटील ढगे आमरण उपोषणास बसले व उपोषणाचा तिसरा दिवस आहे
नायगाव तालुक्यातील वजीरगाव येथे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावे या मागणीसाठी
सामाजिक कार्यकर्ता हणमंत बालाजी पाटील ढगे यांनी 
अमरण उपोषण करीत असताना सुद्धा कोणत्या ही राजकीय पुढाऱ्याने उपोषणकर्त्यांची भेट घेतलेली नसल्यामुळे उपोषणकर्त्यातून संताप व्यक्त केला जात आहे 
मराठा समाजाचा ५० टक्केच्या आत ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यात यावा, मौजे अंतरवाली सराटी येथील आमरण उपोषण स्थळी मराठा समाज बांधव भगिनीवर अमानुषपणे मारहाण करणारे संबंधित पोलीस अधिकारी यांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी उपोषण कर्त्यांची असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुका अध्यक्ष विश्वनाथ बडूरे यांनी वजीरगाव येथे भेट घेतली आहे

मौजे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणास बसलेले आमचे बांधव मनोज जरांगे पाटील व हदगाव येथे बसलेले आमचे बांधव दत्ता पाटील हडसनीकर यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून हणमंत बालाजीराव पाटील ढगे यांनी दिनांक ५ सप्टेंबर २०२३ पासून वजीरगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथे आमरण उपोषणास बसले असल्यामुळे उपोषणाचा तिसरा दिवस आहे

सरकारने अथवा राजकीय नेते मंडळींनी उपोषण कर्त्याची व सदरचे आरक्षण मराठा समाजाला ओबीसीतून दिले नाही तर येत्या दिनांक ९ सप्टेंबर २०२३ पासून आणि त्याग करण्याचा हणमंत बालाजीराव पाटील ढगे यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना इशारा दिला आहे 




Post a Comment

0 Comments