Header Ads Widget

महात्मा फुले कॉलनीतील साठ वर्षीय इसमाची ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या -

        माधव पवार
नायगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या प्रॉपर महात्मा फुले कॉलोनीतील एका साठ वर्षे इसमानी ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे असलेल्या लिंबाच्या झाडाला स्वतःच्या दस्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक ४ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १ ते बदीड वाजण्याच्या दरम्यान घडली असल्याचे मुस्तापुरे व साई सांगवीकर यांनी सांगितले आहे आहे

पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या नायगावच्या  ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे मोठे लिंबाचे झाड त्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या  केली सदरील घटनेची पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार मयतांची मुलगी गेल्या एक ते दीड वर्षाखाली मृत्यू पावल्यामुळे सदरचा मयत हा नेहमी टेन्शनमध्ये राहत होता असे साई सांगवीकर यांनी माहिती दिली आहे

शहरातील रहिवासी असलेले मयत प्रकाश गोविंद पोटफोडे यांचे प्रेत ताब्यात घेऊन पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली मयताचे शवविच्छेदन करण्यासाठी नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती आहे 

नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली साई सांगवीकर व मुस्तापुरे यांनी सदरील घटनेची माहिती कळतच घटनास्थळी रवाना होऊन घटनेचा पंचनामा केला व आत्महत्या केलेल्या इसमाचे प्रेत ताब्यात घेतले पुढील तपास नायगाव पोलीस करत आहे    

Post a Comment

0 Comments