Header Ads Widget

कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घुंगराळा येथे आंतरवाली येथील लाठी चार्ज प्रकरणाचा टायर जाळून निषेध :-

        माधव पवार
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणिकरिता जालना जिल्ह्यातील आंतरवाली या गावात मराठा समाज बांधावाकडून गेल्या काहीं दिवसांपासून शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना अचानकपणे पोलीस यंत्रणेने आंदोलन कर्त्या मराठा समाज बांधवावर गोळीबार करत लाठ्या काठ्या नी बेदम मारहाण केली या मारहाणीत अनेक आंदोलन कर्ते युवक, महिला जखमी झाले होत

नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे यांनी दिनांक ४ सप्टेंबर २०२३ रोजी नांदेड जिल्ह्यासह नायगाव शहर बंद असल्याने नांदेड ते देगलूर राज्य महामार्गावर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चौक बंदोबस्त ठेवला होता 

या हल्याच्या निषेधार्थ नांदेड हैद्राबाद महामार्गावर घुंगराळा ता. नायगाव येथे रास्ता रोको आंदोलन करून या घटनेचा निषेध व्यक्त करत आंदोलनकर्त्यां वर हल्ला करणाऱ्या पोलीसांनवर गुन्हे दाखल करून जालना चे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या वर कार्यवाही करून सेवेतून निलंबित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.
    
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश चिटणीस वसंत सुगावे पाटील,बालाजीराव हाळदेवाड, माधव पा. ढगे, बालाजी पा. ढगे, सहदेव तुरटवाड, राम पा.सुगावे, महेश पा. ढगे, ज्ञानेश्वर पा.मरवाळे, सहदेव तुरटवाड, ज्ञानेश्वर पा. ढगे, रोहित पा. ढगे, सचिन पा. सुगावे, साहेबराव पा. ढगे, साईनाथ पा.सुगावे, मोहन पा. ढगे, विलास पा. ढगे, बाजीराव पा. ढगे, राजेश पा. ढगे,

शुभम गबाळे, सिद्धार्थ पट्टेकर, बारकू पा. ढगे, प्रदीप पा.सुगावे, शंतनू पा. ढगे, आकाश पा.तोरसे, निखिल पा.जगताप, ऋषीकेश पा.सुगावे, वैभव पा. सुगावे,निळकंठ पा.जगताप, आदी उपस्थित होते 

Post a Comment

0 Comments