मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात आज ही आरक्षणाची धग मराठा समाजात कायम असल्यामुळे
नांदेड जिल्ह्याच्या नायगांव तालुक्यातील बेटकबिलोली व घुंगराळा सावरखेड येथील मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा देण्यात येत आहे
आरक्षण मिळाले पाहिजे आरक्षण आमच्या हक्काच नाही कोणाच्या बाप्पाच अशा घोषणा देऊन पाठींबा देण्यात आला व नायागांवच्या तहसीलदार मंजूषाताई भगत यांना निवेदन देण्यात आले आहे
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे एका महिन्याचा मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अवधी देण्यात आला परंतु कुठल्याच हलचाली चालू झाल्या नसल्यामुळे आता जागोजागी साखळी उपोषण करण्यात येत आहे
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे व मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बेटकबिलोली ते नायगाव रस्त्यावर रॅली काढण्यात आली असून मराठा समाजाला आरक्षण नाही मिळाल्यास राज्यात परत एकदा रास्ता रॉको आंदोलन तीव्र छेडण्यात येईल असा इशारा मराठा समाजाच्या वतीने देण्यात येत आहे

0 Comments