Header Ads Widget

मराठा समाजाचा ५० टक्केच्या आत ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यात यावा म्हणून वजीरगाव येथे सामाजिक कार्यकर्ता हनमंत पाटील ढगे यांचे आमरण उपोषण चालू - नायगावच्या तहसीलदारांना निवेदन -

         माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे वजीरगाव येथील एक  सामाजिक कार्यकर्ता मराठा समाजाचा ५० टक्केच्या आत ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यात यावा या मागणीसाठी दिनांक ५ सप्टेंबर २०२३ पासून आमरण उपोषणास बसणार असल्याचे नायगावच्या महिला तहसीलदार मंजुषाताई भगत यांना निवेदन देण्यात आले आहे
प्रशासनाला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात व मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी हो प्रशासनाला धारेवर धरण्यासाठी आता हानमंत बालाजीराव पाटील ढगे वजीरगावकर यांनी आमरण उपोषणास बसले आहे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लोकशाही मार्गाने उपोषण करीत असताना सदरच्या आंदोलकावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे सर्व राज्यात संतापाची लाट पसरली आहे

नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील वजीरगाव येथे सामाजिक कार्यकर्ता हणमंत बालाजीराव पाटील ढगे वजीरगावकर यांनी राज्यातील राज्य सरकारला झोपेतून उठवण्यासाठी अमरण उपोषणास बसले आहेत 
मराठा समाजाचा ५० टक्केच्या आत ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यात यावा, मौजे अंतरवाली सराटी येथील आमरण उपोषण स्थळी मराठा समाज बांधव भगिनीवर अमानुषपणे मारहाण करणारे संबंधित पोलीस अधिकारी यांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी उपोषण कर्त्यांची आहे

मौजे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणास बसलेले आमचे बांधव मनोज जरांगे पाटील व हदगाव येथे बसलेले आमचे बांधव दत्ता पाटील हडसनीकर यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून हणमंत बालाजीराव पाटील ढगे यांनी दिनांक ५ सप्टेंबर २०२३ पासून वजीरगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथे आमरण उपोषणास बसले आहे

मराठा समाजाचा जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत उपोषण तीव्र करण्यात येईल यांची प्रशासन आणि नोंद घ्यावी अशी उपोषणकर्त्यांनी सांगितले उपोषणाची लोकशाही मार्गाने दमदार सुरुवात तर पहिला दिवस आहे

Post a Comment

0 Comments