Header Ads Widget

हिमायतनगर येथील परमेश्वर मंदिरामध्ये पोलीस मित्र संघटनेची पहिलि बैठक संपन्न

हिमायतनगर : नागोराव शिंदे - 

हिमायतनगर : या बैठकीच्या अध्यक्षस्थानी हिमायतनगर पोलीस स्टेशनचे एपीआय नंदलाल चौधरी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संजयजी माने विलासराव वानखेडे यांची उपस्थिती लाभली होती

दिनांक २२  रोजी पोलीस मित्र संघटनेची बैठक श्री गजानन भगत सर राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख यांच्या सुचनेनुसार संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री संतोष दादा चौधरी यांच्या आदेशानुसार हि बैठ आयोजित करण्यात आली होती

यावेळी नांदेड जिल्ह्यासह हिमायतनगर तालुक्यातील सर्व पोलीस मित्र संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव पतंगे , आनंदराव जळपते नांदेड जिल्हा सह सचिव, हिमायतनगर तालुका अध्यक्ष नागोराव शिंदे पळसपुरकर , प्रमेश्वर काळे (बबलु) सज्जन सुर्यवंशी, शिवशंकर गारशेटवाड, संतोष बास्टेवाड, सुधाकर वाढोनकर,निलैश ऐरणकर,अजय येरेकर ,
प्रदीप तपासकर, 

यांच्या सह महिला पोलिस मित्र म्हणून कु राणि जाधव पवना, आशा गव्हाणकर ,शितल महाजन,ज्योति चवरे, किरण तपासकर , ज्योति जुळवेकर , रंजना मुनेश्वर , यांच्या सह महिला पुरुष पोलीस मित्र  पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

 यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून एपीआय श्री नंदलाल चौधरी यांनी सर्व पोलीस मित्रांना मार्गदर्शन करताना सांगितले की त्यांचे अनुभवातून मी सुद्धा असाच एक दिवस पोलीस मित्र म्हणून समोर बसलो होतो

मी एपीआय आहे पोलीस मित्रापासूनच प्रगती होते परंतु प्रथमतः कोणत्याही मानधनाची परवा न करता समाजसेवेसाठी आपण समोर आले त्याबद्दल सर्वांचे प्रथमता त्यांनी अभिनंदन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिमायतनगर तालुकाध्यक्ष नागोराव शिंदे यांनी केले तर आभार नांदेड जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव पतंगे यांनी मानले

Post a Comment

0 Comments