Header Ads Widget

ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या सात बंधार्‍यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम मान्यता देण्याची खासदार हेमंत पाटील यांची देवेंद्र फडणवीसा कडे मागणी -

हिमायतनगर : नागोराव शिंदे -

राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती १ च्या १९४ व्या बैठकीत ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प तालुका पुसदजिल्हा यवतमाळ या प्रकल्पाला सहावी सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून या प्रकल्पास राज्य मंत्रीमंत्रळाच्या बैठकीत अंतिम मान्यता देण्यात यावी अशी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाकडे मागणी केली आहे

हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने महत्वाचे असलेले प्रकल्प खासदार हेमंत पाटील यांनी हाती घेऊन ते मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात या अनुषंगाने दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ रोजी मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वरील मागणी केली आहे

यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत १२ जानेवारी २०२३ रोजी झालेल्या बैठकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघातील पैनगंगा नदीवरील सात उच्चपातळी बंधाऱ्यांना यापूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे

उर्ध्व पैनगंगा अंतर्गत प्रकल्पास मंत्रीमंडळात अंतिम मान्यतेसाठी खासदार हेमंत पाटील यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु असून जलसंपदा विभागाने त्यास तातडीने मान्यता देऊन ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प तालुका जिल्हा नांदेड सहावा सुप्रमा तसा प्रस्ताव नाशिक येथील महासंचालक कार्यालयाच्या राज्यस्तर तांत्रिक सल्लागार समितीला पाठविला आहे




Post a Comment

0 Comments