नांदेड जिल्ह्याच्या नायगाव पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार बाचावार यांनी स्ट्रीक भूमिका घेतली असल्यामुळे शहरातील वाहन धारकासह रस्त्या वरील दुकानदाराना बेशिस्तची व्यवस्थित शिस्त लावण्यासाठी नायगाव पोलीस महत्वाची भूमिका घेतली असल्यामुळे या मोहिमेत फौजदार बाचावार यांनी कडक भूमिका घेतली आहेनायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी अवघ्या वीस दिवसात मोटार वाहन कायद्या अंतर्गत केलेल्या दमदार कारवाईत एकूण ३०१ वहानावर दंडात्मक कारवाई करून १ लाख ५९ हाजार ५०० रुपयाचा दंड वसुन केला आहे
मुंबई पोलीस हे त्यांचे ब्रीद वाक्य “सद् रक्षणाय खलनिग्रहणाय” या प्रमाणे खरोखरच कर्तव्य करीत असल्यामुळे पोलीस हा जनतेचा रक्षक असतो आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये म्हणून पोलीस ठाणे प्रमुखासह ठाण्यातील पोलीस कर्मचारी काम करीत असतात तशाच पद्धतीने नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी कर्तव्य बजावत आहेनांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या हेडगेवार चौकात व पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात दुचाकीचे अपघात होऊन नये व अपघात टाळण्यासाठी सदरची मोहीम राबविली असल्यामुळे वाहन धारकाना चांगलीच शिस्त लागली असल्याचे दिसून येते त्याच बरोबर रात्रीचे पोलीस गस्त वाढविल्यामुळे बिनकामी लोक रस्त्यावर फिरकताना दिसून येत नसल्याचे दिसत आहे
पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी रात्रीची पोलीस गस्त वाढविल्यामुळे रिकाम टेकडे रस्त्यावर दिसत नाहीत या पूर्वी रात्रभर देशी दारू ढोसून रस्त्यावर पडणारे व नशा उत्तरल्यावर रस्त्यावर भटकंती करणारे यांच्यामुळे चोर किंवा सजन समजायला मार्ग नव्हता अशाच संधीचा फायदा घेऊन चोरटे घरफोडी करत होते आता रिकाम टेकडे फिरत नसल्यामुळे थोडा फार चोरीला आळा बसला ? आहे

0 Comments