येत्या आगामी काळातील लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकी दरम्यान राज्यातील राज्य कर्त्यांना सन २०२४ मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीच्या दरम्यान सदरच्या राजकीय पुढाऱ्यांना जनताच मैदान दाखवेल व राज्यातील राजकीय नेते मंडळीच्या विश्वासाला नक्की तडा बसेल असे सदरच्या जनतेतून बोलल्या जात आहे
महाराष्ट्राच्या जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या आंदोलकावर करण्यात आलेल्या लाठी चार्जमुळे सर्वत्र संतापाची लाट पसरली असल्यामुळे जिकडे पाहवे तिकडे या राज्यातील सरकारचा निषेध केला जात असून सदरचे सरकार हे सत्तेसाठी सत्तेवर बसले परंतु जनतेच्या हितासाठी सदरच्या सरकारचे धोरण नसल्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुकी मध्ये जनता मैदानात दाखवेल अशीच चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे
लोकशाही मार्गाने मराठा समाजाच्या लोकांनी सरकारला आरक्षण देण्याच्या संदर्भात गेल्या अनेक वर्षापासून मोर्चे आंदोलने जलसमाधी सारखे कठीण प्रसंग घेऊन मराठा समाज सरकार आरक्षण देईल या आशेने रस्त्यावर उतरत असले तरी बळाचा वापर करून सदरचे आंदोलने हाणून पाडण्याचे काम आज पर्यंतच्या सरकारने केले आहे
या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला एका महिन्यात आरक्षण देतो असे घोषित केले होते परंतु मराठा समाजाला आरक्षण तर मिळालेच नाही अखेर मराठा समाजाच्या आंदोलकाला पोलिसा कडून लाठी चार्ज मध्ये मार खावा लागला आहे
सदरच्या समाजाच्या मागण्या ह्या रास्ता असल्यामुळे सरकारकडे आरक्षण मिळावे म्हणून मागण्या करीत असून त्यांना आरक्षण का ? मिळू नये सरकारने मराठा समाजाला जाहीर सांगावे अशी ही चर्चा आहे

0 Comments