नायगाव तालुक्याच्या वजीरगाव येथे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ता हनमंत बालाजीराव पाटील ढगे यांनी दिनांक ५ सप्टेंबर २०२३ पासून उपोषणास बसले आहेत
अमरण उपोषणाचा तिसरा दिवस असल्याने त्यांच्या तब्येती मध्ये बिगाड होत चालत असल्याने आरोग्य विभागाची टीम वजीरगावात दाखल झाली असल्याचे सांगण्यात येत आहे
तालुक्यातील वजीरगाव येथील उपोषणकर्त्याची तपासणी केल्याच्या नंतर वैद्यकीय सेवा सुरळीत देण्यासाठी डॉ वजीरगाव येथे उपस्थित झाले असून सदरील अमरण उपोषण कर्ता उपोषणावर ठाम आहे
वजीरगाव येथे एक सामाजिक कार्यकर्ता आपल्या मराठा समाजाच्या हितासाठी राज्यातील राज्य सरकारकडे ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून व त्याच बरोबर अंतराली सराटी येथील उपोषण करते मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सदरच्या कार्यकर्त्यांनी उपोषण करीत आहेत
वजीरगाव येथे हनमंत बालाजीराव पाटील ढगे यांचे अमरण उपोषण तर नायगावच्या तहसील कार्यालया समोर हिप्परगा येथील सतीश रामचंद्र पाटील कदम व गजानन पाटील कदम यांनी दिनांक ७ सप्टेंबर २०२३ आमरण उपोषण करीत आहे

0 Comments