Header Ads Widget

आनंदाचा शिधा लाभ धारकाला स्वस्त धान्य दुकानदारानी व्यवस्थित वाटप करावे तहसीलदार मंजुषाताई भगत -

         माधव पवार
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून गोरगरीब जनतेसाठी आनंदाचा शिधा योजने अंतर्गत गेल्या वर्षापासून अमलात आनला असल्याने दिवाळी गुढीपाडवा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने वाटप करण्यात येत आहे
गौरी गणपती उत्सवाच्या मुहूर्तावर आनंदाचा शिधा वाटप करण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदारानी दिरंगाई करू नयेत तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितल्या आहेत 

नायगाव तालुक्यातील एकूण ८९ गावातील स्वस्त धान्य दुकानदारानी महाराष्ट्र शासनाने गोरगरीब पात्र लाभार्थाना आनंदाचा शिधा हे अतिशय महत्त्वाकांक्षी योजना काढली आहे

सदरच्या गावातील पात्र लाभार्थ्यांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा मिळत असून सदरच्या स्वस्त धान्य दुकानदारानी प्रत्येक लाभार्थ्यांच्या घरी हा आनंदाचा शिधा गेला पाहिजे यांची काळजी घेऊन वाटप करण्यात यावे असे नायगावच्या कर्तव्यदक्ष महिला तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी स्वस्त धान्य दुकानदाराना आवाहन केले आहे 


Post a Comment

0 Comments