नायगाव तालुक्यातील शांती निकेतन विद्यालय रुई बु. येथे सन २००९,१०,११ साली प्राथमिक शिक्षण घेतलेले येथील शिक्षक देविदास हिवराळे यांची मुलगी आणि मुलगा यांनी शिक्षण घेऊन एम बी बी एस वेल्स मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल चेन्नई येथे प्रवेशासाठी पात्र ठरल्यामुळे नायगाव पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांच्या हस्ते आदित्य देविदास हिवराळे यांचा सत्कार करण्यात आला आहे
तालुक्यातील शांती निकेतन विद्यालय रुई बु.येथे शाळेवर कार्यरत असलेले जस्ट शिक्षक देविदास हिवराळे यांनी आपल्या मुलीला व मुलांना या सदरच्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण दिले होते
त्या नंतर उच्च शिक्षण घेण्यासाठीअन्य शाळेत प्रवेश दिला होता कुमारी दिप्ती देविदास हिवराळे आणि चिरंजीव आदित्य देविदास हिवराळे यांचा चेन्नई येथे एम बी बी एस साठी वेल्स मेडिकल कॉलेज अँन्ड हॉस्पीटल चेन्नई येथे प्रवेश झाला असल्यामुळे माणिकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी आदित्य हिवराळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे

0 Comments