Header Ads Widget

राजकीय पुढाऱ्यासह प्रशासनाने धनगर समाजाला गुलामा सारखी वागणूक देऊ नये आमचा हक्क आम्हाला द्यावा.म्हणून नायगावच्या तहसीलदारांना निवेदन

         माधव पवार
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानांच्या माध्यमातून धनगर समाजाला त्यांच्या हक्काचे व त्यांचे जीवन चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी त्यांना आरक्षण दिले त्या आरक्षणाचा परिपूर्ण फायदा होण्यासाठी धनगर समाजाला एसटीचे प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे या मागणीसाठी धनगर समाजाच्या बांधवाने नायगावच्या तहसीलदारांना निवेदन देऊन कळविले आहे
गेल्या १८ ते १९ दिवसा पासून धनगर समाजाला एसटीचे आरक्षण मिळावे म्हणून मौजे चोंडी येथे धनगर समाजाचे बांधव उपोषण करीत आहेत त्यांना समर्थन देण्यासाठी नायगाव तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने दिनांक २५ सप्टेंबर २०२३ रोजी आमचा हक्क आम्हाला द्यावा ह्या मागण्या घेऊन येळकोट येळकोट जय मल्हार अशा घोषणा देत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे 
महाराष्ट्र राज्यातील राजकीय पुढाऱ्यासह प्रशासनाने धनगर समाजाला गुलामा प्रमाणे वागणूक देऊ नये अशी खंत यावेळी नायगावच्या तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाच्या दरम्यान धनगर समाजाच्या बांधवांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे यांच्या नेतृत्वाखाली नायगावच्या तहसीलदारांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे 

गेल्या स्वातंत्र्याच्या काळापासून म्हणजे ७५ वर्षापासून आमचा धनगर समाज सामाजिक दृष्ट्या पुढारलेला  नाही आर्थिक दृष्ट्या पुढारलेला नाही राजकीय दृष्ट्या पुढारलेला नाही त्यासाठी प्रशासनानी धनगर समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण द्यावेत व एसटीचे सर्टिफिकेट द्यावेत जेणे करून त्यांच्या मुला बाळाला भविष्यात त्यांचा फायदा होईल या अपेक्षेने धनगर समाजाच्या वतीने प्रशासनाला त्यांच्या मागण्याचे निवेदन पोहोचले पाहिजे या हेतूने नायगावच्या तहसीलदार मंजुषा भगत यांना देण्यात आले आहे 





Post a Comment

0 Comments