पुन्हा एकदा लोहा पोलिसांची विना नंबरच्या मोटार सायकलवर कारवाई करण्याचे धाडसत्र चालू केले असून खबरदार कोणी शासकीय कामात अडथळा निर्माण केला तर पोलीस निरीक्षक चिंचोलीकर यांनी चांगलाच दम लावला आहे
लोहा पोलिसांनी परत एकदा १३ विना नंबरच्या मोटर सायकली जप्त केल्या आहेत सदरच्या प्रकरणांमध्ये पोलीस अधिकाऱ्याला व कर्मचाऱ्यांना फोन करून कोणी धमकी देण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यांची कसल्याच प्रकारची गैय केली जाणार नाही असा ठणठणीत इशारा पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी दिला आहे
लोहा येथे विना नंबर गाड्यांची क्रेझ तयार झाली असून अशा गाड्या वरून चेन स्नेकिंग मुलींना छेडण्याचे प्रकार वाढले होते तसेच अनेक गाड्यांचे रजिस्ट्रेशन झालेले नाहीत किंवा चोरीचे गाड्या असल्याचा संशय लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांना असल्यामुळे लोह पोलिस ठाण्याच्या वतीने मोटार वाहन कायदे अंतर्गत सदरची विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती पो.नि. चिंचोलकर यांनी दिली आहे
लोहा पोलिसांनी राबवीत असलेल्या विशेष मोहिमेमध्ये
विना नंबरची वाहने जप्त करण्यात येत असून त्यांची कागदपत्रे पाहून तसेच आरटीओ कडे पाठवुन कारवाई करण्यात येत असून सदरच्या विना नंबरच्या मोटार सायकली चोरीचे आहेत का ? हे तपासले जात आहे.
वाहने कोणाचे ही असले तरी त्याच्यावर कार्यवाही होणार असल्याचे पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी सांगितले असून पोलीस स्टेशन लोहा कडून सदरचे आवाहन करण्यात येत आहे की आपल्या गाडीवर नंबर टाकावा कोणी ही फॅन्सी नंबर किंवा दादा काका मामा लिहू नये अथवा विना नंबर वाहनाची चोरी झाल्यास अथवा तिचा गैरवापर झाल्यास वाहन धारकाचेच नुकसान होऊ शकते असे ही पोलीस निरीक्षक चिंचोलीकर म्हणाले आहे

0 Comments