Header Ads Widget

नायगाव फास्ट न्यूजची दखल : तालुक्यासह ग्रामीण भागातील स्मशान भूमीचा प्रश्न लावणार तहसीलदार मंजुषा भगत

         माधव पवार 
नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागातील स्मशान भूमीचा प्रश्न गंभीर बनला असल्यामुळे याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधीसह गावातील सरपंच उपसरपंच त्याच बरोबर ग्रामसेवक यांनी सदरचे बाबी सोडविण्यासाठी दुर्लक्ष केले असल्यामुळे सदर प्रश्न मार्गी लावण्यासाठी नायगावच्या तहसीलदार मंजुषा भगत यांनी लक्ष देऊन प्रयत्न करणार असल्याचे नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे

तालुक्यातील अनेक खेड्यापाड्यात स्मशान भूमीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून भेडसावत असल्यामुळे या बाबीची सर्व कल्पना राजकीय पुढाऱ्यासह प्रशासनाला असताना सुद्धा याकडे आज पर्यंत कोणत्या ही पुढाऱ्यानी लक्ष दिले नव्हते परंतु नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून दिनांक २५ सप्टेंबर २०२३ रोजी ऑनलाईन वृत प्रकाशित करण्यात आले त्याची दखल घेऊन तहसीलदार भगत यांनी हा प्रश्न मार्गी लावणार आहे 

प्रशासनातील एक जबाबदार अधिकारी म्हणून नायगावच्या तहसीलदार मंजुषा भगत यांनी खेड्यापाड्यातील समशान भूमी कडे लक्ष देऊन सदरचा गंभीर प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वतः चौकशी करणार असल्याचे ही महिला तहसीलदाराने सांगितले आहे

तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या मौजे कृष्णूर येथील समशान भूमीचा प्रश्न सुद्धा अतिशय कठीण असल्यामुळे व त्याच बरोबर रुई बु येथे स्मशान भूमी बांधण्यात आली परंतु या समिशान भूमी कडे अंत्ययात्रा घेऊन जाताना ओढ्याच्या पाण्यातुन घेऊन जावे लागते या स्मशान भूमीकडे जाण्यासाठी पुलाचे उदघाटन करण्यात आले होते

तरी पूल होत नसल्यामुळे ऐनवेळी एखाद्या वेळी अंत्यविधी करण्यासाठी शेताकडे न्यावे लागत असल्यामुळे सर्व बाबीची दखल घेऊन तहसीलदार भगत यांनी शासन दरबारी पाठपुरावा करणार आहे

Post a Comment

0 Comments