Header Ads Widget

मराठा आरक्षणासाठी नांदेड ते हैद्राबाद राज्या महामार्गावर रास्ता रोको राज्य सरकारचा निषेध

        माधव पवार
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी नायगाव तालुक्यात रास्ता रोको करण्यात आला असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण उपमुख्यमंत्री अजित दादा पवार नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर आमदार राजेश पवार यांचा रास्ता रोकोच्या दरम्यान निषेध करण्यात आला आहेनांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील मौजे वजीरगाव येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतित्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढनू सदरच्या पुतळ्याचे दहन केले आहे

तर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा घुंगराळा येथे जाहीर निषेध करण्यात आला तर कृष्णूर येथे खासदार प्रताप पाटील चिखलीकर व नायागांव विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पवार यांचा निषेध करण्यात आला आहेजिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील नांदेड ते हैद्राबाद राज्य  महामार्गावर कुंटूर फाटा व घुंगराळा व कृष्णुर येथे रास्ता रोको करण्यात आली मिठ्या प्रमाणात वाहतूक खोळबंली तर अनेक येणाऱ्या जाणाऱ्या प्रचंड लोकांची गैरसोय झाली मराठा आरक्षण चांगलेच पेटले  आहे 
सदरचा रास्ता रोको ३ वाजून ३० मिनिटांनी माघार घेण्यात आला नायगाव तालुक्यात शांततेत रास्ता रोको झाला असल्याच्या नायगावच्या तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितल्या आहेत

नायगाव तालुक्यातील रास्ता रोकोसाठी पोलीस प्रशासनाने कार्यकर्त्यांना सहकार्य केल्याच्या भावना रास्ता रोकोच्या माध्यमातून दिसून आले पोलीस आणि जनता रोकोच्या काळात समन्वय दिसुन आला सदरच्या रास्ता रोको दरम्यान पोलीसांना ही तारेवरची कसरत करावी लागली आहे
कृष्णूर येथे रास्ता रोको आंदोलनात   श्रीपत पाटील शिंदे,शिवाजी पाटील, जाधव वसंत, रावसाहेब जाधव,पर्वता पाटील जाधव आणि गावातील बहुसंख्य तरुण वर्ग उपस्थित होता

नांदेड त हैद्राबाद राज्य महामार्गावरील वाहतून रामतीर्थ  पोलीस ठाण्याचे सपोनि संकेत दिघे व कुंटूर पोलीसाच्या मदतीने सुरळीत चालू करण्यात आली घुंगराळा येथे दंगल नियंत्रणच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे

बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सुद्धा रास्ता रोको करत असलेल्या घुंगराळा येथे भेट दिले या कामी कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल बहातरे यांनी चोक बंदोबस्त ठेवला आहे 


Post a Comment

0 Comments