Header Ads Widget

पोळ्याच्या सणासह गणेशोत्सव व ईद असे धार्मिक उत्सव शांततेत करावेत नायगावच्या तहसीलदार मंजुषा भगत यांचे आवाहन

        माधव पवार
नायगाव तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या शेतकरी बांधवानी दिनांक १४ सप्टेंबर २०२३ रोजी साजरा होणारा होणाऱ्या पोळ्याच्या सणा बरोबर गणेशोत्सव व ईद असे धार्मिक उत्सव शांततेत पार पाडावे असे आवाहन नायागांवच्या महिला तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितल्या आहेत 

नायगावच्या महिला तहसीलदार मंजुषा भगत यांनी पुढे म्हणल्या की वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचा एकमेव सण अर्थात पोळा हा सण दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो परंतु कोरोना महामारीच्या संकटामुळे सदरचा उत्सव घरच्या घरी साजरे करण्यात आले आहे 

या वर्षी लंम्पी वायरसमुळे जणावर आनंदाच्या दिवसात संकट निर्माण झाले असल्यामुळे शासनाच्या आदेशानुसार शेतकरी बांधवानी आपल्या बळी राजाला जपून पोळ्याचा सण साजरा करावा असे ही तहसीलदार भगत म्हणल्या आहेत

पोळा हा सण देखील या वर्षी हर्षो उल्हासात साजरा करण्यात येत असला तरी बळी राजावर लंपी व्हायरस संकट असल्यामुळे साधे पणाने सर्वत्र साजरे होत आहेत

पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना आवतण देण्यात येते ओढा वा नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद व तुपाने शेकतात त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल सर्वांगावर गेरूचे ठिपके शिंगांना बेगड डोक्याला बाशिंग गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा घालीत असतात ही परंपरा आहे 

नवी वेसण नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात गोड पुरण पोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य दाखवतात ही परंपरा आज ग्रामीण भागात कायम असल्याने जणे करून आपल्या बळी राजाला लंपीचा धोका निर्माण होईल असे बैल जमवू नयेत असे तहसीलदार म्हणल्या आहेत 

Post a Comment

0 Comments