Header Ads Widget

दोन लाखाच्या खंडणीसाठी जेल मध्ये टाकण्याची धमकी नायगाव पोलीसात गुन्हा दाखल पोनि चिंचोलकर यांची माहिती -

        माधव पवार 
नायगाव तालुक्यातील मौजे सुजलेगाव येथील रहिवासी असलेले सुभाष गंगाराम नवहारे यांना दोन लाखाची खंडणी मागणाऱ्या व जेल मध्ये टाकतो म्हणाऱ्या आरोपीलाच नायगाव पोलीसा कडून जेरबंद होण्याची वेळी आली आहे

या प्रकरणी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोनि चिंचोलकर यांनी दिली आहे

तालुक्यातील सुजलेगाव येथील फिर्यादी सुभाष गंगाराम यांना दिनांक १२ ऑगस्ट २०२३ दीड ते अडीच वाजण्याच्या दरम्यान सार्वजनिक बांध्याकाम विभागाच्या कार्यलयाच्या समोरील रोडवर यातील आरोपीने फिर्यादी मौजे सुजलेगाव येथील जमिनीवर नायगावच्या तहसीलदाराला आरोपीने दिलेल्या तक्रारी अर्जानुसार बोजा चाढविला आहे

सदरचा बोजा काढून घेण्यासाठी दोन लाख रुपयाची खंडणीची मागणी केली जर दोन लाख रुपये नाही दिल्यास तुझी जमीन जप्त करण्यासाठी लावतो व तुला जेल मध्ये टाकायला लावतो अशी धमकी घालून खंडणीची मागणी केली

फिर्यादी सुभाष गंगाराम नवहारे वय ४९ वर्ष राहाणार सुजलेगाव यांनी नायगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्या वरून आरोपीच्या विरोधात गुन्हा १२५ /२०२३ कलम ३८५ भादवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाण्याचे पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार बाचावार पुढील तपास करीत आहेत

Post a Comment

0 Comments