Header Ads Widget

रुई बु. येथे साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी - कुंटूर पोलीस ठेवला चोक बंदोबस्त !!

        माधव पवार
नायगाव तालुक्याच्या कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या रुई बु. येथे साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती मोठ्या उत्साहात दिनांक २८ ऑगस्ट २०२३ रोजी साजरी करण्यात आली असून या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमा निमित्त अण्णाभाऊंच्या तैल चित्राची मिरवणूक दुपारी चार वाजता गावातील मुख्य रस्त्याने निघाली आहेतालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रुई बु येथील साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल नागोराव बहातरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार आर टी पवार यांच्यासह नूतन जमादार भार्गव सुधाकरराव सुवर्णकार पोलीस कॉन्स्टेबल अशोक घुमे त्याच बरोबर आनंदराव कदम हिप्परगेकर यांनी चौक बंदोबस्त ठेवला होताकुंटूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील रुई बु हे गाव अतिशय धार्मिक सण असो की महापुरुषांच्या जयंती असो यात शिवछत्रपती शिवाजी महाराज,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महापुरुषांच्या जयंती सोहळ्यात संपन्न होत आहेत

सर्व समाज बांधव एकत्र येऊन सदरची जयंत्या शांततेत पार पाडण्यासाठी सर्व समाज बांधव एकत्र येऊन महापुरुषांच्या जयंती मध्ये दरवर्षी सहभाग घेत आहेत 

Post a Comment

0 Comments