माधव पवार
नायगाव कृषी कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची सूचना करण्यात येते की सदरच्या शेतकऱ्यानी पंतप्रधान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी व बरेच शेतकरी सदरच्या योजने पासून वंचित असल्यामुळे अशा शेतकऱ्यांनी महत्त्वाची कागदपत्रे देऊन सदरच्या सन्मान योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे
तालुक्यातील शेतकऱ्यांनी सदरच्या सुचनेकडे लक्ष केंद्रित करून सदर देण्यात आलेली महत्वाची सूचना अशी की काही ठिकाणी बँके मध्ये शेतकऱ्यांचे खाते आधार लिंक आहेत परंतु पी एम किसान ॲप मधे लिंक नाही असे दिसून दिसून येत असल्यामुळे त्याचे कारण म्हणजे सदर खाते केवळ आधार लिंक नुसती करून चालणार नाही बँकेत जाऊन एन पी सी आय फॉर्म भरून खाते आधार स्पीड डी बी टी साठी एनबल करण्यासाठी विनंती करणे गरजेचे आहे
शेतकऱ्यांना असे करणे शक्य होत नसल्यास थेट पोस्ट खात्याच्या बँकेत जाऊन खाते उघडण्यात यावे असे
खाते आधार सीडेड डी बी टी एनब्लीड खाते असेल व याच खात्यावर अनुदान जमा होईल पोस्टात खाते उघडण्यासाठी कोणते ही चार्जेस लागणार नाही असे ही नायगावचे तालुका कृषी अधिकारी एस डी वरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहाय्यक अधिकारी जयवंतराव पाटील यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे
एखाद्याच्या खात्यास आधार लिंक असू शकते परंतु त्याचे एन पी सी एल मॅपिंग केले नसल्यास त्याला डी बी टी द्वारे देण्यात येणारे लाभ मिळू शकत नाही त्यामुळे आपल्या खात्याचे एन पी सी आय मॅपिंग झाले आहे की नाही त्याची पडताडणी करून घ्यावी नसल्यास त्यांनी बँकेत जाऊन ते तो करून घेऊ शकतो किंवा इंडियन पोस्टल पेमेंट बँक मध्ये खाते उघडणे अतिशय महत्वाचे आहे

0 Comments