Header Ads Widget

महसूल प्रशासनातील कर्तुत्वान तलाठी विजय पाटील जाधव यांना भोपाळा येथे निरोप देऊन गावकऱ्यानी केले सन्मानित !!

        माधव पवार 
नायगाव तहसील कार्यालयात कार्यरत असताना एक कर्तुत्वान तलाठी म्हणून तालुक्यात प्रसिद्ध असलेले विजय पाटील जाधव यांची रामतीर्थ येथे बदली झाल्याच्या नंतर भोपाळा येथील गावकऱ्यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात भव्य निरोप समारंभ दिनांक ७ ऑगस्ट २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे

अशा या कर्तव्यदक्ष तलाठ्यांचा भोपाळा येथील समस्त गावकऱ्यांच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करून  तलाठी विजय पाटील जाधव यांना निरोप देऊन सन्मानित करण्यात आले आहे

तालुक्यातील नरसी मुगाव मरवाळी गौरी शेळगाव येथे तलाठी म्हणून काम करत असताना शेतकऱ्यांच्या हितासाठी व अडीअडचणीवर मात करण्यासाठी कर्तव्यशील असलेले तलाठी विजय पाटील जाधव यांनी शेतकऱ्यांसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश पाळून आपले कर्तव्य बजाविले आहे
तलाठी विजय पाटील जाधव यांची तीस वर्षे तालुक्यात सेवा झाल्याच्या नंतर त्यांची बदली बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथे करण्यात आली त्या पूर्वी घुंगराळा येथे मंडळधिकारी म्हणून काम पहिले होते

महसूल प्रशासनात काम करीत असताना त्या कर्तव्याची जाण असलेले तलाठी विजय पाटील जाधव हे जनसामान्य माणसासह शेतकऱ्याचे काम तत्पर नेहमी करीत असतात अश्या ह्या कर्तुत्वान तलाठ्याचा भोपाळा येथील गावकऱ्यांच्या वतीने व ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने भव्य सत्कार करून निरोप देण्यात आला आहे

या सत्कार प्रसंगी यावेळी माजी सरपंच आनंदराव बावणे सुधाकर पाटील बावणे जगनाथ पाटील राजू पाटील बंनसोडे, पोलीस पाटील वाघमारे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

0 Comments