Header Ads Widget

नांदेड जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चितळे यांच्या विशेष उपस्थितीत ३८ वर्षाची सेवा बजावणाऱ्या दता नरसिंगराव भरपूरे शासकीय जीप चालक यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न !!

          माधव पवार
नायगाव तालुक्यातील नरसी येथील रहिवासी असलेले व जिल्हा परिषद बांधकाम विभागात उत्कृष्ट पणे शासकीय वाहनावर चालक म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या दता नरसिंगराव भरपूरे जि.प.बांधकाम उप बिलोली विभागात काम करणारे व शासकीय सेवेत ३८ वर्षे सेवा बजावले असल्यामुळे नांदेड जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चितळे यांच्या उपस्थितीत बिलोली येथे सेवापुर्तीचा सोहाळा संपन्न झाला आहे 
तालुक्यातील नरसी येथील रहिवासी असलेले शासकीय जीप चालक व उत्कृष्ट कर्मचारी दत्ता नरसिंगराव भरपूरे यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थिती मध्ये बिलोली येथे सेवापुर्तीच्या सोहळ्यात निरोप देण्यात आला यावेळी त्यांच्या सहप्तनिक व त्यांच्या कुटुंबाचा अधिकाऱ्याने सत्कार करून त्यांच्या आयुष्यातील केलेल्या कर्तव्याची परतफेड केली असल्याचे सदरच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमात दिसून आली आहे
बिलोली येथे आयोजित करण्यात आलेल्या सेवापुर्तीच्या सोहळ्याला सेवानिवृत्त दत्ता नरसिंगराव भरपूरे यांचे  ईवई बालाजीराव काकडे सहशिक्षक तेलूर तालुका कंधार जिल्हा नांदेड यांचा ही यावेळी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्या सहप्तनिकसह कुटुंबाचा यावेळी विशेष सत्कार करून सन्मानित करण्यात आले आहे 
 
बिलोली येथील सेवापुर्तीच्या सोहळ्या निमित्त जिल्हा परिषद बांधकाम विभाग नांदेडचे अभियंकारी चितळे यांच्यासह जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे नांदेडचे उपअभियंता रायभोगे शाखा अभियंता गरुडकर ओ एस जिल्हा परिषद उपविभाग बिलोली नारनाळे कनिष्ठ सहाय्यक अहमद स्थाआपती अभियंता बिलोली पांचाळ कोषागार आदी शासकीय कर्मचारी उवस्थित होते

जिल्हा परिषदेचे गँगमन गणपत पिराजी पवार नागोराव लक्ष्मण पवार यांच्यासह आदी अधिकारी व कर्मचारी या सेवापूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमाला मोठया संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments