नायगाव तालुक्यातील घुंगराळा ते बळेगाव रुई बु रस्ताची गुत्तेदारा कडून कामाची गती वाढविली असताना दुसरीकडे दोन ठिकाणी शेतकऱ्यांनी रस्ता अडवल्यामुळे सोडून देण्यात आला सदरच्या बाबीची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ शेतकऱ्यांची भेट घेऊन तोडगा काढावा आणि रस्ता सुरळीत चालू ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत शेतकऱ्यांच्या समस्या असल्यामुळे रस्ता अडविण्यात आला असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे
या मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांच्या प्रयत्ना मधून सदरच्या रस्त्याच्या कामासाठी १३ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्यामुळे सदरच्या रस्त्याचे काम होताना दिसत असले तरी या रस्त्याचे गुत्तेदारा मार्फत काम करण्यात येत असल्याने काही शेतकऱ्यांच्या अडचणी समोर आले आहेत त्या दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या तात्काळ समस्या सोडवाव्यात असे सदरील जनतेतून बोलल्या जात आहे
गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून घुंगराळा ते बळेगाव रस्ता हा बेवारस होता या रस्त्याकडे कोणत्या ही लोकप्रतिनिधीचे लक्ष नव्हते व प्रशासनाचे सुद्धा लक्ष या रस्त्यावर नव्हते परंतु आमदार राजेश पवार यांच्या माध्यमातून रस्त्याच्या कामासाठी एकूण १३ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्यामुळे सदरचे काम एका नामांकित गुत्तेदारा मार्फत म्हणजे मनोज पाटील मोरे टाकळीकर यांच्या कडून दर्जेदार करण्यात येत आहे
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घुंगराळा ते बळेगाव रुई रस्त्याकडे लक्ष देऊन ज्या ठिकाणी काम अडवण्यात आले त्या शेतकऱ्यांशी तात्काळ भेट घ्यावी व त्यांचे समाधान करून समस्याचा निपटारा करावा सदरच्या शेतकऱ्यांना प्रशासनाने पूर्वी मावेजा दिला नसल्याचे सांगण्यात येत आहे

0 Comments