जून २००२३ रोजी च्या बकरी ईद च्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये गोवंशाच्या कतलीच्या उद्देशाने वाहतूक करताना आढळून आलेले वाहन व संशयास्पद रित्या बेवारस बांधून ठेवलेले गोवंश या आणि अशा इतर प्रकरणांमध्ये कसा यांनी न्यायालयांमध्ये रिटर्न ऑफ प्रॉपर्टीचे दावे दाखल केलेले होते.
अशा विविध प्रकरणांमध्ये कर्मयोगी फाउंडेशन द्वारा संचलित देवकृपा गोशाळा तथा गोविज्ञान केंद्र पवना तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड च्या वतीने ॲड जगदीश हाके, ॲड सुमीतजी तोष्णीवाल यांनी गोशाळेच्या वतीने बाजु मांडली होती.आम्ही आक्षेप अर्ज दाखल करून आमच्या गोशाळेचे म्हणणे न्यायालयापुढे मांडले होते न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून कसायांनी दाखल केलेले दावे नामंजूर केले
आणि सर्व निकाल देवकृपा गोशाळेच्या बाजूने दिलेले आहेत.ओएमसीए नं. ७८६/ २०२३, एफआयआर नं. २३२/२०२३, पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड , वाहन क्रमांक एम एच २३ डब्लु ३७१३ या प्रकरणांमध्ये वाहन मागणीचा अर्ज न्यायालयाने नामंजूर केला आहे,
ओएमसीए नं. ८२९/ २०२३, एफआयआर नं. २१८/२०२३,पोलीस स्टेशन भाग्यनगर या प्रकरणात एम एच ३८ एक्स०८२० वाहन मागणीचा अर्ज न्यायालयाने नामंजूर केला आहे.
ओएमसीए नं. ८४२ एफआयआर नं. १९२/२०२३ पोलीस स्टेशन इतवारा अंतर्गत दाखल गुन्ह्यामध्ये एक गोवंश जप्त करण्यात आला होता ओएमसीए नं. ८००/२०२३, एफआयआर नं. २३९/२०२३, पोलीस स्टेशन भाग्यनगर अंतर्गत जप्त वाहन क्रमांक एम एच ३८ एक्स ३१११, ओएमसीए नं. ८५९/२०२३ पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण एफआयआर नं. ४७२/२०२३ टाटा पिगायो मधुन गोवंशाची कत्तलीसाठी वाहतुक करतांना सापडला.
ओएमसीए नं. ८७७/२०२३, एफआयआर नं. २३९/२०२३, पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण अंतर्गत ६ गोवंश कत्तलीसाठी घेऊन जातांना पकडलेले आहे.
ओएमसीए नं. ९०५, एफआयआर नं. ४७८/२०२३, पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण अंतर्गत ३ गोवंश कत्तलीसाठी घेऊन जात असताना जप्त करण्यात आले होते.
ओएमसीए नं. ८६१, एफआयआर नं. ४७८/२०२३, गोवंश कत्तलीसाठी घेऊन जातांना एम एच २६ एडी ५६१० मधुन गोवंश कत्तलीसाठी घेऊन जप्त करण्यात आले होते.
सदरच्या सर्व प्रकरणात कसायांनी देखील वाहन व गोवंश मागणीचे अर्ज दाखल केलेले होते, आणि देवकृपा गोशाळेच्या वतीने आक्षेप अर्ज दाखल केले होते, आमचे आक्षेप अर्ज मंजूर करून कसायांचे गोवंश मागणीचे दावे नामंजूर केलेले आहे. देवकृपा गोशाळेने आक्षेप अर्ज दाखल करून भक्कमपणे आपली बाजू मांडली आणि न्यायालयाने गोशाळेची बाजू ऐकून बहुतांशी निकाल गोशाळेच्या बाजूने दिलेले आहेत
यावेळी देवकृपा गोशाळेचे संचालक किरण बिच्चेवार नायगाव फास्ट न्यूज शि बोलताना म्हणाले आजपर्यंत १५० च्या वर नांदेड जिल्ह्यातील विविध कोर्टात कसायांच्या विरोधात आक्षेप दाखल करून हजारो गोवंशास जिवनदान देण्यात यश मिळाले आहे. या यशाचे श्रेय वकील, विश्व हिंदु परिषद, बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि असंख्य गोरक्षकांना तसेच गोरक्षा व गोसेवेच्या कार्यास कळत नकळत सहकार्य करणाऱ्या सर्वांना जाते

0 Comments