Header Ads Widget

पोलीस गाडीचा लाल दिवा दिसताच अनेकांना घाम फुटतो तेव्हा -

         माधव पवार
शहरी भाग असो अथवा ग्रामीण भाग असो गुंडगिरीला आळा बसवण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागते जेव्हा पोलीस अधिकारी रात्रीचा गस्त मारतात तेव्हा अनेक गुंडवर्तीच्या लोकांना पोलीस गाडीचा लाल दिवा दिसताच घाम फुटतो ही ताकद खाकी वर्दीतील माणसाचीच असल्यामुळे त्यांचा धाक सदरच्या खाकीच्या माध्यमातून पोलिसांना मिळतो आहे

पोलीसाची धमक त्यांच्या पोलीस गाडीच्या लाल दिव्यातून दिसून येते म्हणून गुंड वरतीला आळा घालण्यासाठी पोलिसांना रात्रंदिवस पोलीस गस्त मारून जन सामान्य माणसाचे जीवन सुरळीत सुखी ठेवण्यासाठी पोलीसांना मोठे वर्दीचे वरदान आहे 

मुंबई पोलीसाचे ब्रीद वाक्य “सद् रक्षणाय खल निग्रहणाय” या प्रमाणे खरोखरच कर्तव्य करीत असल्यामुळे लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात असली तरी अपुरे पोलीस कर्मचाऱ्याच्या खाकीच्या धाकाने गुंड प्रवृत्तीचे लोक धास्तावून जातात

कोणत्या ही संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंडगिरी वाढली असली तरी पोलिसांच्या पोलीस जीपचा लाल दिवा चमकताच किती ही तालुर खान असला तरी त्यांना पोलिसांच्या धास्तीने  जाग्या वरून पळ काढावा लागतो हे वास्तव चित्र अनेकदा दिसून आले आहे

माणसावर मोठ मोठाले येणारे संकट पोलिसांमुळे टळतात कोणता  ही वाद झालं तरी ही पोलिसांची आठवण येते खून दरोडे गुंडगिरी असे प्रकार होत असताना पहिल्या प्रथम पोलिसांना संपर्क करून माहिती आपण देतो आहे 

गावात शेकडो माणसं असतात परंतु एकाच पोलिसांची अपेक्षा आपण करतो कारण पोलीस येणार असल्याची चाहूल लागताच अनेकाला तंट्याचे रिंगण सोडून पळ काढावा लागतो असे अनेकदा चित्र दिसून येतात ही खाकी वर्दीतील पोलिसांची तेज ताकद आहे 


Post a Comment

0 Comments