Header Ads Widget

माजी आ.वसंतराव पा.चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रम ह.भ.प.रामयनाचार्य.रामराव महाराज ढोक यांचा भव्य किर्तन सोहळा.


विशेष प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे - 

नायगाव विधानसभेचे लोकप्रिय नेते तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष वसंतराव पाटील चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त दि.१५ आॅगस्ट रोजी नायगाव येथे ह.भ.प.श्री रामराव महाराज ढोक यांच्या भव्य किर्तन सोहळ्याचे व धोंडे जेवन  महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे

पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी  सदर किर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मा.आ.वसंतराव पा.चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे
  
दि ‌१५ ऑगस्ट २०२३ रोजी कॉंग्रेस पक्षाचे नेते तथा माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण यांचा वाढदिवस असल्याने वाढदिवसाचे औचित्य साधून मित्र मंडळाच्या वतीने महाराष्ट्राचे प्रसिद्ध किर्तनकारह.भ.प.रामयनाचार्य.रामराव महाराज ढोक यांच्या भव्य किर्तन सोहळ्याचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

नायगाव शहरातील नांदेड रोडवर असलेल्या जयराज पॅलेस मंगल कार्यालय येथे सकाळी ११: वाजता सदर किर्तन सोहळा पार पडणार असून  या नंतर धोंडे जेवण महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे

नायगाव विधानसभेतील जनतेनी याचा लाभ घ्यावा व आपल्या लाडक्या नेत्याच्या अभिष्टचिंतन सोहळ्यास सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments