Header Ads Widget

धर्माबाद पोलीस ठाण्याचे कर्तृत्वान पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांचा जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते सन्मान

         माधव पवार 
नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद तालुक्यातील वन्नाळी येथे गेल्या जुलै महिन्यात अतिवृष्टीने पूर आलेल्या पुरात अडकलेल्या लोकांना आपला जीव धोक्यात घालून पुराच्या बाहेर काढून त्यांचा प्राण वाचवणारे धर्माबाद पोलीस ठाण्याचे कर्तुत्वान पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या दमदार कामगिरीचा वरिष्ठ अधिकाऱ्याने गौरव केला आहे

स्वातंत्र दिनी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या विशेष उपस्थिती मध्ये ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांचा मोठा सन्मान करण्यात आला यावेळी सन्माननीय पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

जिल्ह्यातील धर्माबाद पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांची कामगिरी कौतुकास्पद असल्यामुळे त्यांच्या कार्याची जिल्हा प्रशासन दखल घेऊन त्यांच्या केलेल्या धाडसा बदल व त्यांच्या कार्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सन्मानपत्र देऊन  पोनि अभिषेक शिंदे यांचा विशेष सत्कार केला आहे

धर्माबाद येथील पोलिसांनी या आपत्ती जनक काळात चांगले कार्य केल्यामुळे स्वतंत्र दिनी नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला यावेळी पोलीस विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यानी पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या कार्याचा गौरव करून त्यांचे अभिनंदन केले आहे 


Post a Comment

0 Comments