नायगावच्या ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीयवस्तू चित्र अधिकाऱ्यांसह डॉक्टर सर्व सिस्टर्स यांचे रुग्णालयातील रुग्णाकडे जास्तीचे लक्ष देऊन ट्रेंटमेन्ट सुरळीत देत असल्यामुळे रुग्ण समाधान व्यक्त करत असल्याचे वास्तव चित्र रुग्णालयात दिनांक २१ ऑगस्ट २०२३ रोजी दिसून आले आहे
सदरच्या ग्रामीण रुग्णालयात एकूण ८ पदे आहेत परंतु ५ जागा रिक्त तर ३ डॉकटर ताण पडला आहे
आरोग्य विभागाने नायगावच्या ग्रामीण रुग्णालयातील तात्काळ रिक्त पद भरल्यास रुग्णालयात येणाऱ्या पेशंटला नांदेड येथील शासकीय रुग्णालयात अथवा खाजगी दवाखान्यात रुग्णाला जाण्याची वेळ भासणार नाही सध्याच्या परिस्थिती मध्ये रुग्णालयात अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर ताण येत असला तरी रुग्णाचा विलाज करण्यासाठी सदरील तारेवरची कसरत करावी लागत आहे
नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात रुई बु येथील सौ सविता संतोष पवार या पेशेंटला दाखल करताच वैद्यकीय अधिकारी डॉ सोनकांबळे यांच्यासह डॉक्टर व सिस्टरने अर्जेंट ट्रेंटमेन्ट चालू केल्यामुळे रुग्ण अर्धा तासाच्या आत बरा झाला असून नायगाव येथील युवा नेतृत्व गजानन पाटील चव्हाण यांनी सदरील अधिकाऱ्या बरोबर बोलून चर्चा केली यावेळी माधव पाटील वर्णे होते रुग्णाची काळजी घेण्याची विनंती केली आहे
शासनाने शासकीय दवाखान्याकडे जास्तीचे लक्ष देऊन दवाखान्यामध्ये सर्व सुविधा पुरवल्यास नागरिकांना जनतेला शासकीय दवाखान्यात दर्जेदार उपचार घेता येईल व त्याच बरोबर वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्याच्या रिक्त जागा आरोग्य विभागाने तत्काळ भरून शासकीय रुग्णालय जास्तीचे सुधारून घ्यावे अशी अपेक्षा ही गजानन पाटील चव्हाण यांनी व्यक्त केली आहे

0 Comments