Header Ads Widget

नांदेडच्या जिल्हा परिषदेने पात्र कलावंताची स्वतंत्र दिनापूर्वी निवड करावी अन्यथा उपोषण करण्या बरोबर तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा कलावंताचा इशारा !!


हिमायतनगर : नागोराव शिंदे :

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या महाविकास आघाडीच्या कार्यकाळात जिल्ह्यातील असो की राज्यातील असो कलांवताना त्यांच्या बँक खात्यात पाच हजार रुपये मानधन मिळाले होते तेव्हा पासून राज्यात सरकारची बिघाडी झाली आणि कलावंतावर उपवास मारीची वेळ आली आहे
नांदेडच्या जिल्हा परिषद विभागाने येत्या स्वातंत्र्य दिना पूर्वी  जिल्ह्यातील पात्र कलावंताची निवड करावे अन्यथा स्वतंत्र दिनी तिरंगा झेंड्याखाली अमरण उपोषण करू त्यावर ही शासन लक्ष केंद्रित करीत नसेल तर याच दिवसी जिल्हा परिषदच्या तिसऱ्या मजल्या वरून आत्महत्या करण्याचा इशारा एका कलावंतानी तहसीलदाराला निवेदन देऊन कळविले आहे.
राज्यातले सरकार अस्तित्वात असले तरी कलावंताच्या बँक खात्यात एक रुपया टाकला नसल्यामुळे नांदेडच्या जिल्हा परिषद विभागाने जिल्ह्यातील पात्र कलावंताची निवड करून त्यांच्या बँक खात्यात मानधन टाकावे नसता येत्या दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी तिरंगा झेंडयाखाली अमरण उपोषण करू यावर ही लक्ष केंद्रित नाही केल्यास नांदेडच्या जिल्हा परिषद कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करू असा इशारा कलावंताने इशारा दिला आहेराज्यातल्या सरकारने कलावंताच्या मानधनाकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे कलावंतावर उपासमारीची वेळ आली असली तरी सदरचे कलावंत गेल्या ३० ते ३५ वर्षापासून महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम असो की समाज प्रबोधनाच्या कार्यक्रम असो की जनजागृती कार्यक्रम असो अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचे काम करीत आहे

शासन कलावंतांच्या मानधनाकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे कलावंतावर आज घडीला उपासमारीची वेळ आली असल्याचे नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले शासनाला थेट इशारा दिला आहे

हिमायतनगर तालुक्यातील कलावंतांना शासनाच्या मिळणाऱ्या अनुदानापासून वंचित ठेवल्या बाबत दिनांक ४ ऑगस्ट २०२३ रोजी येथील गटविकास अधिकारी व तहसीलदार हिमायतनगर यांच्यामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना एका निवेदनाद्वारे कळविली आहे या निवेदन रामराव देवराव वानखेडे शाहीर यांनी दिली आहे

Post a Comment

0 Comments