Header Ads Widget

नायगाव पंचायत समितीतील रिक्त असणारी पदे तात्काळ भरा राष्ट्रवादीच्या वसंत पाटील सुगावे यांची मुख्यकार्यकारी अधिकाऱ्याकडे विशेष मागणी !!

         माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव पंचायत समिती मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्यामुळे ती महत्वाचे रिक्त पदे तात्काळ भरावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
   
नायगाव पंचायत समिती येथील या मध्ये विस्तार अधिकारी पंचायत २ जागा रिक्त आहेत विस्तार अधिकारी कृषी २ जागा तर साह्यायक लेखाधिकारी एक कनिष्ठ लेखाधिकारी एक सहाय्यक गटविकास अधिकारी एक वरिष्ठ सहाय्यक एक असे अनेक रिक्त पदे अनेक दिवसांपासून असल्यामुळे ते लवकर भरण्यात यावे म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी अधिकाऱ्याना निवेदन देऊन कळविले आहे

अख्या तालुक्याचा ताण तणाव येथील कार्यरत कर्मचारी व अधिकारी यांच्यावर येत असल्यामुळे नांदेड जिल्हा परिषदच्या नूतन मुखकार्यकारी अधिकारी मीनल करनवाल लक्ष देऊन सदरच्या रिक्त जागा भरावयात अशी मागणी राष्ट्रवादीच्या वसंत पाटील सुगावे यांनी केली आहे 

यामुळे प्रशासकीय कामकाज वेळेवर होत नसून शेतकऱ्यांच्या व गोर गरीब लोकांच्या कामांना विलंब लागत असल्यामुळे तसेच तालुक्यातील अनेक ग्रामसेवकांकडे ५ ते सात गावांचा पदभार असल्याने  अधिक ग्रामसेवकांची गरज भासत असून ग्रामसेवक भरती ही करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे 
  
पंचायत समिती नायगाव येथे पद संख्या कमी असल्यामुळे कामे जलद गतीने होत नाहीत याचा त्रास सामान्य नागरिकांसह सरपंच उपसरपंच ग्रामसेवक कर्मचारी यांना होत असल्याने सदरचे काम फास्ट / स्पीड गतीने होण्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यानी  तालुका हा जिल्ह्यातील मोठा व प्रमुख तालुका असल्याने या ठिकाणी रिक्त पदे भरणे आवश्यक आहे

राष्ट्रवादी  युवक कॉंग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी केली यावेळी घुंगराळा सेवा सहकारी सोसायटी चे चेअरमन श्यामराव यमलवाड उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments