नांदेड जिल्ह्याच्या नायगाव विधानसभा मतदार संघाच्या आगामी काळातील विधानसभेच्या निवडणुकीच्या भावी आमदार म्हणून रेंजमध्ये असलेले व राजकारणातील कांगारू अशी ओळख असलेले नायगाव येथील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश फ्रेंड्स ऑफ बीजेपी अभियानाच्या नांदेड लोकसभा संयोजक पदी निवड झाली असल्यामुळे तमाम जनतेतून त्यांच्या अभिनंदन करण्यात येत आहे
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार व नांदेड जिल्ह्याचे भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पक्षात अतिशय स्वच्छ पद्धतीने काम करत असलेले भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस शिवराज पाटील होटाळकर यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी टाकून भाजपा महाराष्ट्र प्रदेश फ्रेंड्स ऑफ बीजेपी अभियानाच्या माध्यमातून लोकसभा संयोजक पदी निवड केली आहे
भाजपा महाराष्ट्र प्रदेश फ्रेंड्स ऑफ बीजेपी अभियानाच्या अंतर्गत भाजपा पक्षात जास्तीत जास्त फ्रेंड्स अर्थात मित्र जोडण्यासाठी मा. शिवराज पाटील होटाळकर या कर्तुत्ववान व गुण संपन्न राजकीय पुढाऱ्यांची पक्षाने निवड केली असल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांसह तमाम जनतेतून त्यांच्या निवडी बद्दल शुभेच्छा अभिनंदन केले आहे
भाजपा महाराष्ट्र प्रदेश फ्रेंड्स ऑफ बीजेपी अभियानाच्या नांदेड लोकसभा संयोजक पदी शिवराज पाटील होटाळकर निवड

0 Comments