Header Ads Widget

पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुस्तापूर येथे अवैध देशी दारू विक्रेत्यावर ठाण्यात गुन्हा दाखल -

         माधव पवार 
नायगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या मुस्तापूर येथे पोलिसांच्या नजरा चुकून अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या देशी अड्ड्यावर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी धाड मारून आरोपीसह देशी दारू ताब्यात घेतली असल्याची माहिती पोनि चिंचोलकर यांनी दिली आहे 

तालुक्यातील मुस्तापूर येथे अवैध देशी दारू विक्री होत असल्याची गोपनीय माहिती नायगाव पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांना माहिती मिळाल्या वरून आपल्या पोलीस ठाण्याचेपोलीस कर्मचारी रेड मारसाठी टीम पाठवली होती

पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी मागील आठवड्यात  सुद्धा मोटार वाहन कायद्या अंतर्गत शेकडो वाहनावर कारवाई केली त्या पाठोपाठ आता देशी दारूच्या अवैध अड्ड्याकडे लक्ष केंद्रित करून पोलिसांना धाडी मारण्यासाठी सूचना केल्यानुसार आता ठाण्याचे पोलीस कर्मचारी देशी दारूच्या अड्ड्यावर धाड मारण्यास सुरुवात केली आहे 

ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मुस्तापूर येथे दिनांक २४ ऑगस्ट २०२३ रोजी ६ वाजण्याच्या दरम्यान मौजे मुस्तापूर येथील बस स्थानका लगत पान पट्टीमध्ये आनंदा सोपान नेमाळे वय ३२ वर्ष राहणार मुस्तापूर यास ताब्यात घेऊन त्याच्या कडून देशी दारू भिंगरी संत्राचे एकूण २० बॉटल किमती १४०० रुपयेचा मुद्देमाल यासह ताब्यात घेऊन पोहेका विलास मुस्तापुरे यांच्या तक्रारीवरून वरून गुन्हा दाखल  करण्यात आला आहे 

नायगाव पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली एन पी सी साई सांगवीकर हे करीत आहेत



Post a Comment

0 Comments