नायगाव विधानसभा मतदार संघातील उमरी व सिंधी येथील रहिवासी असलेले व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे काम करणारे कवळे गुरुजीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान व त्यांना स्वालंबी बनवण्यासाठी नायगाव उमरी धर्माबाद तालुक्यात शेतकऱ्यांच्या भेटीघाटी घेऊन त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करीत आहेत
नायगाव उमरी धर्माबाद तालुक्यातील शेतकरी वेगवेगळ्या व्यवसायातून कशा पद्धतीने उत्पन्न काढेल हा हा डोळस विचार मनात धरून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारची उत्पन्नात्मक माहिती देत असल्यामुळे त्यांचा फायदा शेतकऱ्यांना नक्की होऊ शकतो असे त्यांच्या मार्गदर्शनातुन दिसून येत आहे
शेतकरी नेते कवळे गुरुजी हे राजकारणा बरोबर समाजकारणा मध्ये ही सक्रिय असल्यामुळे व शेतकरी पुत्र असल्याने शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्या माध्यमातून मोठे प्रयत्न केले जात आहे
शेतकरी राजा हा जगाचा पोशिंदा असल्यामुळे अख्ख जग शेतकऱ्याच्या खांद्यावर असल्याने त्यांना जगाचा पोशिंदा असे म्हणतात त्यानुसार शेतकऱ्यांच्या शेतातील वेगवेगळ्या पिकाच्या माध्यमातून व ऊस उत्पादनातून उत्पन्न होते
गाई म्हशीच्या दूध व्यवसायातून सुद्धा शेतकऱ्यांची मोठी प्रगती होऊ शकते या हेतूने कवळे गुरुजीची संकल्पना ही अतिशय महत्त्वाची असल्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान स्वालंबी करण्यासाठी गुरुजीची ही मोठे धडपड चालू आहे

0 Comments