Header Ads Widget

तहसीलदाराच्या आदेशानुसार रुई बु येथे तलाठी व कृषी सहायक आणि ग्रामसेवक यांच्या मार्फत शेतीच्या पंचनाम्याला सुरुवात !!

        माधव पवार
नायगाव तालुक्यात दिनांक २० ते २७ आणि २८ जुलै २०२३ रोजी झालेल्या अतिवृष्टीमूळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशानुसार नायागांवच्या तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे
रुई बु येथील महिला तलाठी व मंडळधिकारी  व कृषीधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहाय्यक जयवंत पाटील यांच्यासह तलाठी एस जी म्यॅकलवार आणि ग्रामसेवक सूर्यवंशी यांनी शेतीच्या पंचनाम्याला सुरुवात करण्यात आली आहे
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे अतोनात नुकसान झाले असल्यामुळे प्रशासनाच्या मार्फत तालुका प्रशासनाने पंचनामें करण्याचे आदेश महिला तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी दिल्याने रुई बु येथे महिला तलाठी एस जी म्यॅकलवार यांच्यासह ग्रामसेवक एन पी सूर्यवंशी यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी करून नुकसासानीचे पंचनामें करीत असल्यामुळे शेतकऱ्यात समाधान व्यक्त केल्या जात आहे
ग्रामीण भागातील शेतकऱ्यानी नुकसानीचे पंचनामे झाल्याच्या नंतर बँकचे पास बुक आधार लिंक असलेला मोबाईल नंबर त्याच बरोबर आधार कार्ड अशा पद्धतीचे महत्वाचे कागद पत्र द्यावेत असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले असून शेतकऱ्यांनी बँक आधार लिंक नसलेले मोबाईल नंबर देऊ नये असे कळविण्यात येत असून खरे तर नायगावच्या तहसीलदार मंजुषाताई भगत यांच्या आदेशानुसार शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात आली आहे 

Post a Comment

0 Comments