Header Ads Widget

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नांदेड पोलीस दलातील दोन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक !!

        माधव पवार
नांदेड पोलीस दलातील दोन पोलीस अधिकारी बाळकृष्ण जनार्दन हनपुडे पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी बिलोली आणि द्वारकादास गोविंदराव चिखलीकर पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा नांदेड यांना भारतीय स्वतंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला उत्कृष्ट सेवे बदल महामहीम राष्ट्रपती भारत सरकार यांचे राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे
उपविभागीय पोलीस अधिकारी बिलोली बाळकृष्ण जनार्दन हनपुडे पाटील हे मूळचे मोजे करमाळा जिल्हा सोलापूर येथील रहिवासी असून महाराष्ट्र पोलीस दलात दिनांक १० जून १९९१ पोउपनी म्हणून सेवेत हजर झाले त्यांनी वर्धा नागपूर शहर औरंगाबाद शहर अहमदनगर बीड सोलापूर नांदेड या ठिकाणी सेवा बजावली आहे

सन २००५ ते २००७ सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून पोलीस स्टेशन सोनखेड येथे कर्तव्य बजावली आहे

सध्या एस डी पी ओ म्हणून बिलोली येथे त्यांची पहिलीच नेमणूक करण्यात आली असून त्यांच्या सेवा काळात आज पावतो ६७६ बक्षीस व ३५ प्रशस्तीपत्र मिळाले असून १  मे २०१३ रोजी डी जी इनसिंगनिया हे पदक मिळाले आहे

द्वारकादास गोविंदराव चिखलीकर पोलीस निरीक्षक तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी गुन्हे शाखा नांदेड हे मुळचे मोजे चिखली तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथील रहिवासी असून महाराष्ट्र पोलीस दलात दिनांक १५ जुलै १९८९ रोजी पोउपनि म्हणून सेवेत हजर झाले त्यांनी वाशिम जिल्हा बीड जिल्हा औरंगाबाद ग्रामीण या ठिकाणी ठाणे प्रभारी म्हणून काम केले असून ठाणे प्रभारी अधिकारी म्हणून प्रथम पासवर्ड जिल्हा बीड येथे कर्तव्य बजावले आहे

ऑगस्ट २०२० मध्ये कर्तव्य बजावत असताना विकास हटकर या कुख्यात गुन्हेगारावर फायरिंग करून पळवलेल्या मुलाची सुखरूप सुटका केली आहे
विद्यानिया गॅंग मधील आरोपींना पुणे येथून अटक करून मोका कायद्या नवे कारवाई केली तपास केलेल्या सत्र गुन्ह्यातील आरोपीस माननीय न्यायालयाकडून शिक्षा झालेली आहे रेकॉर्ड वरील टोळीतील सदस्य गुन्हेगारांना हद्दपार करण्यासाठी सहकार्य केले आहे 

पोलीस निरीक्षक म्हणून नांदेड जिल्ह्यामध्ये २०१७ ते २०१८ पोलीस स्टेशन देगलूर २०१८ ते २०१९ नांदेड ग्रामीण २०१९ ते २०२० पोलीस स्टेशन देगलूर २०२०  रोजी पासून ते आज  गुन्हे शाखा नांदेड दरम्यानच्या कार्यकाळात त्यांनी चांगली कामगिरी बजावली व केल्याबद्दल ३५० रिवॉर्ड मिळाले आहे

यामध्ये २०२२  मध्ये उत्कृष्ट तपास केल्याबद्दल मा. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांचा पुरस्कार मिळाला आहे एक मे २०२२ मध्ये डीजी इन सिंगनिया हे पदक मिळाले होते त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे

नांदेड पोलीस दलातील उपविभागिय पोलीस अधिकारी बिलोली बाळकृष्ण जनार्दन हनपुडे पाटील यांच्यासह पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर गुन्हे शाखा नांदेड यांचे नायगाव फास्ट न्यूजच्या वतीने अभिनंदन - 






Post a Comment

0 Comments