हिमायतनगर : नागोराव शिंदे :-:-
हिमायतनगर पंचायत समितीच्या वतीने स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षा निमित्त आजादी का अमृत महोत्सव या केंद्र शासनाच्या योजने अंतर्गत राज्यात विविध कार्यक्रमांच्या आयोजनास सुरुवात करण्यात आली असल्यामुळे पंचायत समिती हिमायतनगर येथील गटविकास अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली ७५ वृक्षाची लागवड करण्यात आली आहे
त्या अनुषंगाने दिनांक ११ ऑगस्ट २०२१ रोजी माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ‘आजादी का अमृत महोत्सव’ म्हणजेच ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या उपक्रमाच्या आयोजना बाबत विविध मंत्रालयीन मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव यांच्या समवेत बैठक संपन्न झालेली होती या बैठकीमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते
या उपक्रमांचे आयोजन देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षा निमित्त केंद्र शासनाने सुचित केल्यानुसार १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत राज्यभर जनसामान्यांना सामावून घेऊन करण्या बाबत सूचना करण्यात आलेली होती त्या अनुषंगाने संस्कृती मंत्रालय भारत सरकार यांनी आजादी का अमृत महोत्सव याच्या प्रयोजनार्थ गठीत केलेल्या समितीच्या धर्तीवर राज्यातील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते
हिमायतनगर येथे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री बळवंत व त्यांचे सहकारी विस्तार अधिकारी आरोग्य श्री फटिंग विस्तार अधिकारी कृषी देशमुख विस्तार अधिकारी थेटे विस्तार अधिकारी पवार अहिरे विस्तार अधिकारी तर्फे अधीक्षक पंचायत समिती आर पी गायकवाड आदी वेळी उपस्थित होते
यावेळी कदम संरक्षण अधिकारी यांच्यासह ग्रामसेवक वडजजकर साईनाथ कासटवार शिरारपलू यांच्यासह तालुक्यातील ग्रामसेवक सटलावार यांच्यासह तालुक्यातील सर्व ग्राम पंचायतीचे ग्रामसेवक रोजगार सेवक आदी वृक्षा रोपनाच्या कार्यक्रमाला कर्मचारी उपस्थित होते

0 Comments