नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या माळ ईकळीत गेल्या वर्षा पासून दलित समाजासह इतर समाजात गायरान अतिक्रमणाच्या कारणा वरून वाद खूपत असल्यामुळे अनेक वेळा पोलीस प्रशासनासह तहसील विभागाने यातील तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे
परंतु सदरचा वाद हा वरचेवर वेगळ्या दिशेने जात असल्यामुळे गावातील वातावरण शांततामय राहण्या ऐवजी दूषित होत आहे
तालुक्यातील इकळीमाळ येथे गायरान अतिक्रमणाच्या कारणा वरून कुंटूर पोलीस ठाण्यात परस्परा विरोध गुन्हे दाखल सुद्धा करण्यात आले होते गावात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठाण्याचे सपोनि विशाल बहातरे यांनी पोलिसाचा तगडा बंदोबस्त लावून विशाल कामगिरी केल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे
तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी माळ इकळी येथे पोलीस बंदोबस्ता मध्ये बैठक लावून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता परंतु गावात सामांजस्य पणाचे वातावरण नसल्यामुळे तहसील प्रशासनाला सदरचा तोडगा थांबवा लागला असल्याची चर्चा आहे
सदरील प्रकरणात कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे यांनी मोठा तगडा पोलीस बंदोबस्त लावला होता सदरचा तोडगा हा कशा पद्धतीने निघेल असे नायगाव तालुक्यात चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे
या सदरील प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यासह तहसील प्रशासनाने जर महत्त्वाची भूमिका बजावली तर या गावातील गायरान धारकाचा व गावातील लोकांचा तोडगा निघू शकतो ? अशी ही चर्चा होत आहे
इकळीमाळ प्रकरणात पोलिसांना वेळोवेळी महत्त्वाची भूमिका घ्यावी लागत असून गावात दुसरा काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कुंटूर पोलिसांना वेळोवेळी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे

0 Comments