Header Ads Widget

नायगाव तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवकाने डोळ्याचे आजार टाळण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील घाण व दुर्गंधी स्वच्छ करण्याची आवश्यकता !!

              माधव पवार
नायगाव तालुक्याच्या खेड्यापाड्यातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या घाण कचरा व दुर्गंधी असलेल्या नाल्या स्वच्छ व साफ केल्यास नागरिकांचे आरोग्य टवटवीत राहून गावात वास्तव्यास असलेले नागरिक निरोगी बनण्यासाठी गावच्या विद्यमान सरपंचचासह उपसरपंच आणि ग्रामसेवक एक जबाबदार व्यक्ती म्हणून गावातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन दुर्गंधी व घाण पाणी नष्ट करून स्वच्छ करण्याची आवश्यकता भासत आहे

तालुक्यात सध्याच्या परिस्थितीमध्ये डोळ्याच्या साथीला सुरुवात झाली असल्याचे सांगण्यात येते परंतु सदरच्या डोळ्याचा आजार पसरण्या पूर्वी संबंधित गावच्या विद्यमान सरपंचासह ग्रामसेवकांनी गावांतर्गत स्वच्छता मोहीम राबवून घाण व दुर्गंधी पसरत असलेली जास्तीचे लक्ष घालून नष्ट केल्यास त्या ठिकाणच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही अशा पद्धतीची काळजी विद्यमान सरपंचासह ग्रामसेवकांनी घ्यावी अशी चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे अनेक गावांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले तर नाल्या तुंबल्या असल्याचे वस्तव चित्र दिसून येत असले तरी विद्यमान सरपंचासह ग्रामसेवकांनी तात्काळ डोळ्याच्या आजारा पासून दूर राहण्यासाठी व नागरिकांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी सदरची स्वच्छता मोहीम राबवून घाण पाणी व कचऱ्याची साफसफाई करणे गरजेचे आहे

सदरील नागरिकांना मलेरिया सारख्या आजारा पासून व  डोळ्याच्या साथी पासून बचाव करण्यासाठी सदरील ग्रामपंचायत कार्यालयाने सदरचा स्वच्छता मोहिमेचा उपक्रम राबविने अत्यंत आवश्यक आहे 



Post a Comment

0 Comments