Header Ads Widget

सोमवारी कै. बळवंतराव चव्हाण यांच्या पुण्यसमरणा निमित्त पुष्पांजलीच्या कार्यक्रमाचे आयोजन !!🌹


विशेष प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे :-

लोकनेते नायगाव परिसराचे भाग्यविधाते  कै. बळवंतरावजी चव्हाण यांच्या सोळाव्या  पुण्यस्मरणा निमित्त दिनांक : ७ ऑगस्ट २०२३ रोज सोमवारी सकाळी ९: ३० वाजता पुष्पांजलीचा कार्यक्रम समाधीस्थळ हनुमान मंदिर परिसर जुन्ने नायगाव येथे  साजरा होणार आहे.
कै. बळवंतरावजी चव्हाण यांच्या १६ व्या पुण्यस्मरणा निमित्त दरवर्षी पुष्पांजलीचा कार्यक्रम साजरा करण्यात येतो

या निमित्त त्यांच्या वर प्रेम करणारी व चव्हाण परिवाराच्या संबंधित सर्व स्नेही चाहते आवर्जून उपस्थित राहतात तरी या वर्षी होणाऱ्या पुण्यतिथी निमित्त पुष्पांजली कार्यक्रमास परिसरातील कार्यकर्ते आप्तस्वकीय व मित्रपरिवार यांनी पुष उपस्थीत राहावे असे आवाहन करण्यात आले आहे 

 कै. बळवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण नायगांव बाजारचे अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार वसंतराव चव्हाण व प्रतिष्ठान सचिव व पदाधिकारी यांच्या वतीने सदरचे आवाहन करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments